यादव पॅनेलच्या फलकावरील पद्मसिंह पाटील यांच्या छायाचित्राशी अज्ञाताकडून छेडछाड.
खमक्या : विशेष वृत्तसेवा
येथील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये, यादव पॅनेलकडून लावण्यात आलेल्या अधिकृत उमेदवारांच्या फलकावरील, नगरसेवक पदाचे उमेदवार व विजयाचे दावेदार पद्मसिंह प्रकाशराव पाटील यांच्या छायाचित्रांशी कोणीतरी अज्ञाताने हेतूपुरस्कृत छेडछाड केल्याच्या घटनेमुळे प्रभाग नऊ मध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पद्मसिंह पाटलांमुळे विरोधी उमेदवाराला धोका झाला आहे, उमेदवार पराभवाच्या टोकावर उभा राहिला आहे, याचा कसा बंदोबस्त करायचा या रागापोटी, चिडून जाऊन पद्मसिंह पाटील यांच्या कपाळावर दोन वेगवेगळ्या पेनाने उभ्या आडव्या खरक्या पाडून राग व्यक्त आहे. अशा घटनेमुळे प्रभागात पद्मसिंह पाटील यांच्या वाढत्या वर्चस्वाची दखल मतदारांनी घेण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.
शिरोळ प्रभाग नऊ मध्ये चुरशीची लढत होणार असा सर्वांचा कयास होता. परंतु, बाबा पाटील, पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी प्रचारात घेतलेली आघाडी, जनसंपर्क, मतदारांचा वाढता प्रतिसाद यामुळे निवडणूक एकतर्फी उंबरठ्यावर येऊन थांबली आहे. पर्याय खुंटल्यामुळे कोणीतरी अज्ञात समर्थकाने हे कृत्य जाणीवपूर्वक केले आहे, अशी यादव पॅनलचे उमेदवार पद्मसिंह पाटील यांच्या समर्थकांत चर्चा आहे.
प्रभाग 9 मध्ये शिवाजी काकांनी उमेदवारी मागे घेतल्याचा सकारात्मक परिनाम पद्मसिंह पाटील यांच्या उमेदवारीवर झाला मतदारांनी झुंडीने पद्मसिंह यांना पाठिंबा दिला, ही बाब नैसर्गिक रित्या कोणालाही सहन होणारी नाही, त्यामुळे रागाच्या भरात पद्मसिंह यांच्या कपाळावर उभ्या आडव्या रेषा मारून त्यांच्याबद्दल असणारी घृणा कृतीतून दाखवण्यात आली आहे. हा लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न झाल्यासम असल्याची चर्चा सुरू आहे.