“खमक्या” प्रचाराने स्पर्धकांना फुटलाय घाम, मतदारांची इच्छा नाहीतर काय करतील दाम.
खमक्या : विशेष वृत्त
निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात यादव पॅनेलच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार योगिता सतीश कांबळे यांची प्रचारात सरशी आहे. योगदान व बलिदानाची उतराई म्हणून शिरोळ शहरातील मराठासह सर्व समुदायाच्या मतदारांनी निवडणूक हातात घेऊन कांबळे यांना नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसवण्याची वाटचाल शेवटच्या टप्प्यात आणली आहे.
शिरोळकर मतदारांनी आत्तापर्यंत कोणाला एकालाही सलग सत्ता दिली नाही, आणि देत नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत यादव गटाचे पाठीराखे आम.सतेज पाटील, मा.खा.राजू शेट्टी, दत्तचे सर्वेसर्वा गणपतराव पाटील यांच्या पाठबळावर पृथ्वीराजसिंह यादव, राहुल यादव, अनिलराव यादव यांची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. मतदारांच्या आशीर्वादावर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह प्रभागातील सर्व जागावर निर्विवाद वर्चस्व निर्माण करण्याचा चंग खुद्द मतदाराने बांधला आहे.
मिया बिवी राजी तो,क्या करेगा काझी या उर्दू म्हणीप्रमाणे, हजारोच्या संख्येने मतदार योगिता कांबळे यांना विजयी करण्याच्या तयारीत असतील तर इतर उमेदवार काय करणार? कांबळे यांचा घोडा सर्वात पुढे आहे, त्यांना एकतर्फी वाढणारे लीड तुटणार नाही.म्हणून उर्वरित स्पर्धक उमेदवारांना, विजय हा शब्द पदरात पडेल अशी शक्यता वाटत नसल्याने, त्यांनी, किमान दुसरातरी क्रमांक येईल? या आशेने एकमेकात संघर्ष सुरू ठेवल्याचे चित्र शहरात पहायला मिळत असल्याची मतदारात चर्चा आहे.
नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये यादव गटाने दिलेले उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या तुलनेत, तुल्यबळ आणि राजकीय, सामाजिक वसा, प्रभागात प्रतिष्ठित, सर्वगुणसंपन्न असल्यामुळे निर्विवाद विजय या शब्दाची ताकद आणि आत्मविश्वास उंचावल्याची चित्र सध्या वेगवेगळ्या प्रभागात पाहायला मिळत असल्याचे खुद्द मतदार बोलत आहेत शब्दाचा आत्मविश्वास उंचावला असल्याचे चित्र आहे.