
सगळी राजकीय पदे तुमच्याच घरात का पाहिजेत ? गड्या आपली “योगिता”च बरी,
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
अशोकराव माने हे हातकणंगले तालुक्यातील जनसुराज्य पक्षाचे आमदार आहेत.. त्यांच्या स्नुषा नीता माने या जयसिंगपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष होत्या, मुलगा डॉक्टर अरविंद माने हे शिरोळ नगरपरिषदेचे नगरसेवक होते. तत्पूर्वी अशोकराव माने हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. इतकी राजकीय पदे घरात असताना पुन्हा त्यांच्याच घरात नगराध्यक्ष पद हवे आहे. परंतु, इतकी राजकीय पदे असून सुद्धा त्यांच्याकडून शिरोळसाठी विकासाचे कार्य झाल्याचे आठवत नसल्याचे मतदार बोलत आहेत.
वाढदिवसा निमित्ताने सत्कार करून घेण्यासाठी शिरोळ भूषण पुरस्कार देऊन शहरात दर्जेदार कार्यक्रम घेतला जातो या वेतिरिक्त माने कुटुंबाचे ठळक असे कोणतेही योगदान शिरोळसाठी दिल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे सावध वाटचाल करणे शहराच्या दृष्टीने हिताचे ठरणारे आहे. घराणे शाहीतील राजकीय पदाचे ओझे मानगुटीवर घेणं शहराला परवडणारे नाही. त्यामुळे परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम करणे अनिवार्य असल्याची चर्चा वेगवेगळ्या प्रभागात सुरू असल्याचे समजते.

शिरोळच्या निवडणुकीत वरून तिरंगी लढत दिसत असली तरी राजर्षी शाहू आघाडी आणि भाजपा ताराराणी आघाडी या दोन आघाड्या एकाच नाण्याच्या बाजू आहेत. हे मतदारांनी समजून घेण्याची आवश्यकता असल्याचे जाणकार बोलत आहेत. नुकतेच एका खाजगी कार्यक्रमात, निवडून आल्यानंतर आम्ही एकच आहोत अशी स्पष्टोक्ती आम. अशोकराव माने यांनी केली आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात या दोन आघाड्या एकमेकाला पूरक असा कोणता निर्णय घेतील याची खात्री नाही. पंधरा दिवसांपूर्वी याच अनुषंगाने तमदलगे रस्त्यावरील एका कार्यालयात यासंबंधीची बैठक झाल्याचे मतदार बोलत आहेत.
गड्या आपला गावच बरा, अशा अर्थाने गड्या आपली योगिताच बरी, असे मतदार बोलत असल्याची चर्चा आहे. हे म्हणजे खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे असेच दिसते, मतदारांची दिशाभूल करण्यासाठी दोन वेगवेगळे पर्याय निवडून पुन्हा एकत्र एकाच सत्तेत बसणार असतील तर मतदार, कार्यकर्ते, समर्थकांनी यादव पॅनेलशी दुश्मनी काय घ्यायची? अशी सवादात्मक चर्चा शहरात सुरू झाल्याची कळते.

