पराभवाच्या टप्प्यातील उमेदवार मागताहेत “एक मत” आघाडीत मोठी बिघाडी?
खमक्या : वृत्तसेवा
नगराध्यक्ष पदाचा कोण ही उमेदवार असो, कोणत्याही आघाडीचा, पक्षाचा असो, आमची मते “योगिता कांबळें”ना, योगदान व विकासाला अशी एकच चर्चा शिरोळ शहरात आहे. पॅनेल टू पॅनेल मतदान करण्याचा, मतदारांचा हा पक्का निर्णय यादव पॅनेलच्या पथ्यावर पडला आहे. मतदारांच्या ठाम भूमिकेमुळे प्रतिस्पर्धी उमेदवाराबरोबर आघाडीच्या पायाखालची वाळू घसरल्याची चर्चा होत आहे.
यादव पॅनेलच्या योगिता कांबळे यांना निवडून आणण्याचा मतदारांनी केलेला निर्धार, यादव पॅनेलचे वाढते पाठबळ या बाबी आघाडीला अडचणीत आणणाऱ्या ठरताहेत याचा अंदाज घेऊन राजर्षी शाहू विकास आघाडीचे नेते व आम. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळकडे पाठ फिरवल्याची दबक्या आवाजात चर्चा असल्याचे समजते.
पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखालील यादव पॅनेल वगळता इतरांनी आमच्या पुरते “एक मत” द्या असा धडधडीत प्रचार सुरू केला असल्याचे मतदार बोलत आहेत. त्या उमेदवारांकडून होणारी एक मताची मागणी, आघाडीत मोठी “बिघाडी” आहे, हे सांगून जात असल्याची चर्चा आहे. एकूणच यादव पॅनेलने निवडणुकीचा रंग बदलून टाकला आहे.
विशेष म्हणजे पद्मसिंह पाटील यांनी प्रभाग “नऊ”चा पालटलेला “नुर” आणि चारही बाजूने मिळणारे पाठबळ या घटना विजयाच्या साक्षीदार ठरतील अशा आत्मविश्वास मतदारातून व्यक्त होताना दिसत आहे. निवडून येण्यासाठी कमी मतदारांचा केलेला प्रभाग, मतदान मिळावे म्हणून समुदायातील घुसडलेले समर्थक, मतदार सुद्धा आता बाजूला गेल्याने घाम फुटल्याचे मतदार बोलत आहेत.