Skip to content
खमक्या वृत्तसेवा
प्रभाग नऊ मध्ये यंदा करपलेली भाकरी पलटवण्याचा मतदारांचा निर्णय !
समाज आणि समाजातील कुटुंबांचा उदरनिर्वाह साठी आत्तापर्यंत कोणते योगदान दिले?
जमीन आरक्षणावेळी पायातले पायताण घट्ट आहे, असे म्हणणाऱ्याला प्रभाग नऊचे मतदार उत्तर देणार !
घरात धुणी, भांडी, स्वयंपाक, शेणघाण काढायला नगरपरिषदेकडील मागासवर्गीय कर्मचारी चालतात मतदानावेळी मात्र ॲलर्जी.
तुम्ही असा कोणता आंतरराष्ट्रीय उच्चभ्रू उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उभा केलाय मागासवर्गीय आरक्षणानुसारच ना !
घनकचऱ्यात कोट्यावधी रुपयांचा ढापला कोणी पडला?, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना वेठीस कोणी धरले? 4 कोटी 58 लाखाची माया कोणाच्या तिजोरीत गेली?
शिरोळकरांची आरोग्य सेवा कोणी लुबाडली?, शहरात साथीच्या रोगाप्रमाणे डेंग्यूचा रोग कोणामुळे आला ?
डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झालेल्या घटनेला जबाबदार कोण?
डास प्रतिबंधक धूर फवारणी न करता त्याची बिले परस्पर काढून घेऊन कोणी खिशात घातली?
शिरोळ शहरात टक्केवारीसाठी कोणी ठेकेदारांना पोसले?
केंद्राच्या अमृत 2.0 नळ पाणी योजनेत कोणी हात मारला?
नळ पाणी योजनेचे उद्घाटन चोरून कोणी व का केले?
तुरटी पुरवठा ठोक्यात कोणाची भागीदारी होती कोणी ढपला पाडला?
गरज नसताना टक्केवारीसाठी कोणी शिरोळकरांच्या डोक्यावर भुयारी गटरचे भूत बसवले?
भ्रष्टाचार, भ्रष्ट कारभार केला नाही. तर मग, जनतेसमोर ताट मानेने उत्तर का दिले जात नाही?
कोणाच्या काळात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची रेड झाली? यात सापडलेले संशयित कोणाचे होते?.
घरफाळा, पाणीपट्टीची रक्कम कोणाच्या खिशात गेली? बनावट पावती बुक छापून कर वसुली करण्यामागे कोण होते?.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती साठी जमा झालेली अनामत रक्कम कोणी गायब केली?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अध्यक्ष पद मिळावे म्हणून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करीत होते?
सन 2019 आणि 2021 च्या महापुरात शासन व सेवा संस्थांनी दिलेली संसारिक साहित्याची मदत, जनावरांचे खाद्य, तांदूळ, बिस्कीट बॉक्स कोणी गायब केले?
शिरोळच्या कोंडवाड्याचा सातबारा, प्रॉपर्टी कार्ड कोणाच्या नावे आहे?, शासनाची प्रॉपर्टी कोणी हडप केली?
शासकीय जागेवर असणाऱ्या उद्योग, व्यवसाय, दुकान गाळ्यांचे भाडे कोण परस्पर गायब करतोय व त्यावर कोणाचा उदरनिर्वाह चालवतो?.
फुले, हारतुरे ,गुच्छ विक्रेत्याचे 16 हजार रुपये कोणी लुबाडले? कोण गंडा घातला?
शहर विकास आराखडाच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या शेतजमिनीवर आरक्षण टाकण्यामागे कोणाचा हात होता?
आरक्षण टाकण्यामागे ज्यांचा हात होता, त्यांच्याकडील शासनाच्या वर्ग 2 च्या जमिनीवर आरक्षण का पडले नाही?
बसवेश्वर चौक ते जनता हायस्कूल पर्यंतचा रस्ता कोणामुळे अरुंद झाला?
सत्तेच्या काळात साथ दिलेले नगरसेवक आता सोबत का दिसत नाहीत? कोणत्या कारणातून?
गणपतराव पाटील आणि राजू शेट्टी यांनी का साथ सोडली?
शासनाच्या वर्ग दोनच्या जमिनीवर विनापरवाना बांधकाम करून त्याचा भाडेपट्टा कोण गोळा करतो?
भ्रष्टाचाराच्या पैशातून जमिनी प्लॉट गाड्या घोड कोणी खरेदी केल्या?
अशा शंभरहून अधिक कुरघोड्या करून स्वस्वार्थ, स्वहित, स्वविकास साधणाऱ्याला जनता ,मतदार जागा दाखवणार. यात शंका नसल्याचे लोक बोलत आहेत.