अब्दूललाट येथील विशाल मंडपे आणि रमेश ठिकणे यांच्यावर सावकारी, विनयभंग धमकी व 23 लाखाची खंडणी मागितल्याची पोलिसात तक्रार.
व्याजासह 10 लाख 75 हजार रुपये भागवले, तरीही कोरे चेक आणि अनामत रक्कम परत दिली नाही ; चैतन्य शिक्षण समूहाचे संस्थापक दशरथ काळे.
अब्दुललाट/इचलकरंजी/शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
खाजगी सावकारी मध्ये घेतलेली रक्कम व्याजासह देऊनही विनयभंग केल्याचा खोटा गुन्हा दाखल करून, बदनामीची धमकी देऊन 23 लाखाची खंडणी मागणाऱ्या विशाल शांतीनाथ मंडपे, रमेश दादू ठिकणे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत असा तक्रार अर्ज दशरथ व शरद गणपतराव काळे रा.अब्दूललाट यांनी अप्पर पोलिस अधीक्षक इचलकरंजी यांच्याकडे केला आहे.
आर्थिक अडचणीसाठी रमेश दादू ठिकणे (रा.अब्दुललाट) यांचेकडे 10 लाख रुपये निधी देण्याची विनंती केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझे मित्र विशाल शांतीनाथ मंडपे असे दोघे जन दत्तवाड येथील पाहुणे यांच्याकडून निधी उपलब्ध करतो, मात्र त्यासाठी दरमहा 5 टक्के व्याज द्यावे लागेल असे सांगितले. त्यानंतर होकार देऊन रक्कम संस्थेच्या खात्यावर जमा देण्यास सांगितले.
पैशाच्या सुरक्षेसाठी 15 संस्थेचे आणि वैयक्तिक 10 कोरे चेक देण्याची मागणी केली. त्यानंतर दोघांच्या नावावर प्रत्येकी 5 लाख असे एकूण दहा लाख रुपये जमा घेतले. आणि रमेश ठिकाणे यांच्या नावे संस्थेच्या अनामत रक्कमेच्या पावत्या दिल्या.त्यानंतर त्यांना दरमहा 50 हजार रुपये व्याज, रोखीने देत राहिलो. व्याज देणे अवघड होत निघाल्याने मुद्दल घेऊन व्यवहार पूर्ण करा आणि आमचे कोरे चेक व संस्थेच्या अनामत पावत्या परत करा, म्हणून सांगितले.
त्यानंतर विशाल मंडपे यांनी पत्नी दीपिका विशाल मंडपे हिची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याच्या कारणातून संस्थेच्या दारात उपोषण करणार म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला.बदनामीच्या भितीने विशाल मंडपे याला रुपये 3 लाख दिले आणि प्रकरण थांबविण्याची विनंती केली.
त्यानंतर डिसेंबर 2024 अखेर वेळोवेळी रमेश दादू ठिकणे यांच्या खात्यावर RTGS करून मूळ मुद्दल 10 लाख रुपये आणि व्याजाचे 75 हजार रूपये अशी 10 लाख 75 हजार रुपये भागविली.
हा व्याजाने पैसे देण्याघेण्याचा विषय असताना खोटे कथन करून बदनामीचा प्रयत्न चालू केला आहे. फसवणुकीची तक्रार देणार आणि बदनाम करणार, विनयभंगाची केस दाखल करणार म्हणून दशरथ व शरद काळे सराना सांग अशा निरोप वैभव कोळी यांच्याकडून देत आहेत. तसेच रमेश ठिकणे माझ्याकडे आपले कोरे चेक आहेत ते बाऊन्स करून तुमच्यावर फौजदारी करतो अशी भीती घालत आहेत.
वास्तविक या व्यवहाराची सगळी जबाबदारी विशाल मंडपे यांनी लेखी संमतीने रमेश दादू ठिकणे यांना दिलेली असताना विशाल मंडपे हे कधी पत्नीच्या तर कधी स्वतःच्या नावाने तक्रारी करून ब्लॅकमेल करून खंडणी मागत आहेत.तरी अर्जाची गंभीर दखल घेऊन विशाल शांतीनाथ मंडपे याच्यावर बेकायदा खाजगी सावकारी, आणि विनयभंगाची खोटी केस करण्याची भीती घालून खंडणी मागणे असे गुन्हे दाखल करून कारवाई करावी असे तक्रार अर्जात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती, मुख्यमंत्री, गृहमंत्री जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक कुरुंदवाड यांना दिल्या आहेत.