“मँगो”, “मूर्ती लहान पण, कीर्ती महान” व “सखी” यांची व्यवसायावर पकड असल्याची चर्चा !
“भोग्या”ना भाड्याने जागा देणारे व “भोग्या” ठेवून बिनधास्त व्यवसाय करणाऱ्या लॉज धारकाकडे पोलिसांची डोळेझाक का ?
कुरुंदवाड : खमक्या वृत्तसेवा
शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर, कोंडीग्रे, चिपरी, नांदणी, मौजे आगर, नृसिंहवाडी, कुरुंदवाड येथील “लॉज”वर कायदा धाब्यावर बसून बिनधास्तपणे “भोग्या” व्यवसाय केला जात आहे. याशिवाय “भोग्या” व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींबरोबर भागीदारी करून काही तासासाठी लॉज भाड्याने देऊन लाखो रुपयांची कमाई करण्याबरोबर तरुण पिढीला वाम मार्गाला लावले जात असल्याची चर्चा आहे.
तसेच आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या व्यक्तींना हाताशी धरून, त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन, शासकीय अधिकारी, कर्मचारी व बँक कर्मचारी, यासह फायद्याच्या लोकांना, “भालू” नामकाच्या मदतीने एका “सखी” मार्फत भोग वस्तूंचा पुरवठा केला जात असल्याची चर्चा असून मार्गदर्शन शिबिर, अभ्यास दौरा, ट्रिप या नावाखाली मद्यपान, नाचगाणे, डिनर असा कार्यक्रम राबवला जात असल्याचे तालुक्यात बोलले जात आहे.
पैसे मिळवण्यासाठी लॉज धारकांनी वापरलेला फंडा तरुणांच्या जीवाशी आणि त्यांच्या कुटुंबाशी खेळणारा ठरणारा आहे. लाखो रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक करून सुद्धा ग्राहक मिळत नाही म्हणून, बिनधास्तपणे “भोग्या” व्यवसाय केला जात असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी अशा “भोग्या” व्यवसाय करणाऱ्या लॉजवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
काही दिवसापुर्वी कोल्हापूर येथील ‘करवीर निवासी यात्रि निवास’ येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसाय अड्ड्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांनी छापा टाकून पर्दापाश केला. मुख्य आरोपी म्हणून नाव पुढे आलेल्या इंद्रजीत उर्फ बबलू सयाजीराव गायकवाड याला पळो की,सळो करून सोडले. पाच महिलांची सुटका केली. अनेक कुटुंबावरचे संकट दुर केले.
अशीच कारवाई कुरुंदवाड, शिरोळ, जयसिंगपूर पोलिसांनी करून तरुणांची Human Immunodeficiency virus या घातक विषाणूपासून सुटका करावी. “भोग्या” व्यवसायाला काही तासासाठी “लॉज”ची खोली भाड्याने देणे किंवा लॉजवर “भोग्या” ठेवून व्यवसाय करणे अशा व्यवसायाचा परवाना रद्द करावा. अशी मागणी होत आहे.
याशिवाय “भोग्या” व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची लॉजधारक यांच्याकडून माहिती घेऊन त्यांच्या कुटुंबाला परस्पर सूचना करण्यात यावी. सध्या, “मँगो”, “मूर्ती लहान पण, कीर्ती महान” व “सखी” यांनी व्यवसायावर हुकूमत ठेवण्याबरोबर प्रतिष्ठा शोभा वाढवून तरूणांना भुरळ घातल्याची चर्चा आहे.