भगवान राजाराम बियाणी रा. गल्ली नं.5, राधाबाई रोड जयसिंगपूर यांच्या राहत्या घरी दि.22 झालेल्या 56 लाख 70 हजार रुपये किमतीच्या सोने, चांदी, माणिक, हिरेजडित दागिन्यांच्या चोरीचा छडा लावण्यात जयसिंगपूर पोलिसांना यश आले आहे.
घरातील नोकर संतोषबाई मदनलाल प्रजापत, मुळगाव सोयतखुर्द ता. सुसनेर जि. शाजापुर राज्य-मध्य प्रदेश व विनायक मलगोंडा पाटील, मुळगाव मिरज मालगाव रोड, भोकरे प्लॉट सुभाषनगर, मिरज (दोघे सध्या रा. गल्ली नं 8 जयसिंगपुर ता. शिरोळ) या दोघांनी संगणमत करून चोरी झाल्याचा बनाव करून सुमारे 57 लाख रुपयांच्या दागिन्यावर डल्ला मारला होता.
जयसिंगपूर आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय खबर्यामार्फत माहिती उपलब्ध करून पहिल्यांदा संतोषबाई तिच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर तिने विनायक पाटील याला घेऊन दोघांनी मिळून चोरी केल्याचे कबूल केले.
महीला कामगार संतोषबाई प्रजापत हिने कामगार विनायक पाटील यास इलेस्ट्रीक ग्रॅन्डर कटर मशीन आणुन दिले व फिर्यादी याचे दुस-या मजल्यावरील खोलीचे गज कापुन कोणीतरी बाहेरील इसम घरात प्रवेश करुन लोखंडी गज कापुन चोरी केली असावी असे बनावट दृश्य निर्माण केले.
त्यानंतर खोलीचे लाकडी कपाट उचकटुन कपाटातील सोने, हिरे व मोत्याची दागीने लंपास केले. दोन्ही आरोपी वाहून चोरीच्या माला पैकी 50 लाख 70 हजाराचे सोने, हिरे व मोत्याची दागीने जप्त करण्यात आले. जयसिंगपुर पोलीस ठाणे तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी गंभीर, दिवसा घरफोडीचा गुन्हा जलदगतीने तपास करुन उघड केला.