
इचलकरंजी : खमक्या वृत्तसेवा
वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणाच्या गंभीर प्रकरणांमध्ये एक महत्त्वाचा आणि मार्गदर्शक ठरलेला निर्णय म्हणजे “कुसुम शर्मा वि. बत्रा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर”. एखाद्या डॉक्टरने उपचार करताना योग्य वेळी विशेषज्ञाकडे रुग्णाचा संदर्भ न दिल्यास, आणि त्यामध्ये विलंब झाल्याने रुग्णाचे कायमस्वरूपी नुकसान झाले, तर तो वैद्यकीय निष्काळजीपणाचा गुन्हा मानला जातो, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यात दिला होता.
सदरक्षणाय खलनिग्रहणाय, जयसिंगपूर पोलीस ठाणे. येथे क्लिक करा : https://khamkyanews.in/?p=292
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी:
कुसुम शर्मा यांच्या पतीला त्रास होऊ लागल्यावर त्यांना दिल्लीतील प्रसिद्ध बत्रा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्या रुग्णालयात काही दिवस उपचार चालू राहिले, मात्र डॉक्टरांनी आवश्यक त्या विशेषज्ञांशी सल्लामसलत केली नाही किंवा रुग्णाला न्यूरोलॉजिस्टकडे तात्काळ पाठवले नाही. परिणामी, योग्य निदान आणि उपचार न मिळाल्यामुळे रुग्णाचे शरीर पक्षाघातग्रस्त झाले.
न्यायालयाचे निरीक्षण:
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात म्हटले की:“जर एखाद्या डॉक्टरला माहित असतानाही की रुग्णाच्या स्थितीत विशेषज्ञ उपचार आवश्यक आहेत, तरीही त्याने उपचार चालू ठेवले, किंवा योग्य वेळी विशेषज्ञाकडे रुग्णाचा संदर्भ दिला नाही, तर त्याला वैद्यकीय निष्काळजीपणासाठी जबाबदार धरले जाईल.
”IPC अंतर्गत कोणत्या कलमांखाली गुन्हा ठरतो?:
या प्रकारच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचे गंभीर नुकसान झाले असल्यास, खालील भारतीय दंड संहितेतील कलमे लागू होऊ शकतात: कलम 338 : कोणत्याही व्यक्तीच्या जीवनास किंवा सुरक्षिततेस धोका निर्माण करणारी निष्काळजी कृती, ज्यामुळे गंभीर दुखापत झाली. कलम 337 – निष्काळजीपणामुळे किरकोळ पण शारीरिक इजा झाल्यास.या कलमांखाली दोषारोप ठरल्यास, डॉक्टर किंवा संबंधित हॉस्पिटल कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो, व शिक्षेची तरतूदही आहे.
जयसिंगपूर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची जिगरबाज कामगीरी ! येथे क्लिक करा : https://khamkyanews.in/?p=296

महत्वाचे मुद्दे:
डॉक्टरने उपचार करताना स्वतःच्या क्षेत्राबाहेर जाऊन उपचार केले.योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेतला नाही.विलंबामुळे रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा न होता अधिक बिघाड झाला.न्यायालयाने हे वैद्यकीय निष्काळजीपणाचे ठळक उदाहरण मानले.फैसला आणि निकाल:न्यायालयाने रुग्णालय व डॉक्टर दोघांनाही जबाबदार धरून नुकसानभरपाई देण्याचे व कारवाईचे आदेश दिले. या निर्णयामुळे वैद्यकीय क्षेत्रात उपचार करताना काळजी घेणे, वेळेवर योग्य विशेषज्ञांकडे रुग्ण पाठवणे आणि क्षेत्राबाहेरील उपचार टाळणे किती आवश्यक आहे, हे अधोरेखित झाले आहे.
डॉ. अमित देशमुख व डॉ. सौरभ कुलकर्णी यांनीही अमर कोले या रुग्णाच्या मेंदूत रक्तस्राव झाला असतानाही आपल्या क्षमतेबाहेर उपचार सुरू ठेवले. त्यामुळे रुग्णाची प्रकृती खालावली. रुग्णास आधुनिक उपचार हवे आहेत, असे सांगून बळजबरीने रुग्णास डिस्चार्ज घ्यावा लागला. त्यामुळे उपचारास विलंब होऊन रुग्णाचे शरीर दुर्बल झाले. आता या प्रकरणात डॉक्टरांवर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.
