तमदलगे (ता.शिरोळ) बसवान खिंडीच्या डोंगरामध्ये झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात जयसिंगपूर पोलिसांना कमालीचे यश आले आहे, “सदरक्षणाय, खलनिग्रहणाय” या ब्रीद वाक्याला साजेशा कामकाजामुळे कोल्हापूर जिल्ह्यात जयसिंगपूर पोलिसांचे खास कौतुक होत आहे.
अविनाश उर्फ दिपक ओमगोंडा पाटील याचा सख्या भावाने सहा लाख रुपयांची सुपारी देऊन खून केल्याची धक्कादायक घटना पोलिसांनी समोर आणली आहे. खुनाचे गांभीर्य लक्षात घेऊन जयसिंगपूर पोलीस ठाण्याची दोन पथके आणि कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेकडील तीन पथकांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारावर सूत्रदारासह आरोपींना, जेरबंद केले.
पोलिसांनी जिनगोंडा ओमगोंडा पाटील, वय 37, रा. सांगली बायपास रोड, गौंडाप्पा मळा, निमशिरगाव, ता. शिरोळ, मोहन प्रकाश पाटील, वय 33, रा. सांगली बायपास रोड, नायरा पेट्रोल पंप जवळ, निमशिरगाव, राकेश उर्फ विनोद वसंत थोरात वय 23 रा. धनगर वाडा, कुंभोज रोड, दानोळी, किरण आमान्ना थोरात वय 27 रा. नवीन पाण्याची टाकी, धनगर वाडा, दानोळी, सागर भिमराव लोहार, वय 30 रा. दिलदार चौक, भादोले, ता. हातकणंगले, अमर रामदास वडर, वय 33 रा. दिलदार चौक, भादोले, ता. हातकणंगले यांना खुनाच्या गुन्ह्यात अटक केली.
चौकशी पथकास सुरुवातीलाच सख्खा भाऊ जीनगोंडा पाटील याच्या हालचाली संशयित वाटू लागल्याने पोलिसांनी जिनगोंडा याच्याकडे कसून चौकशी केली. भाऊ अविनाश हा दररोज दारु पिवुन घरी भांडण करुन त्याच्या मुलांना पत्नीला मारहाण करीत होता.
अविनाश याच्या कृत्याला कंटाळुन जीनगोंडा याने आपला मित्र मोहन प्रकाश पाटील यास अविनाशचा काटा काढायचा आहे, असे सांगितले. त्यानंतर मोहन पाटील याने त्याचे ओळखीचे राकेश उर्फ विनोद वसंत थोरात, दानोळी, रा.धनगर वाडा, कुंभोज रोड. यास बोलावुन घेवुन अविनाशला ठार मारायचे आहे, असे सांगीतले.राकेश थोरात याने अविनाश यास मारण्यासाठी 6 लाख रुपये देण्यास सांगीतले. यावर जिनगोंडा याने मारायच्या आधी 3 लाख व मारलेनंतर 3 लाख रुपये देण्याचे कबुल केले.
राकेश व त्याचे साथीदार किरण आमान्ना थोरात, रा. नवीन पाण्याची टाकी, धनगर वाडा, दानोळी, सागर भिमराव लोहार रा. दिलदार चौक, भादोले, अमर रामदास वडर रा. दिलदार चौक, भादोले यानी अविनाशवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली होती. योग्य संधी पाहुन तमदलगे गावचे हद्दीत बसवान खिंडीत असले निर्जन डोंगरात नेवुन अविनाश पाटील याचे डोक्यात दगड घालुन निघृण खुन केल्याची कबूली दिली.
त्यानंतर जयसिंगपुर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापुर यांनी समांतर तपास यंत्रणा राबवुन आरोपींना निमशिरगाव, दानोळी व भादोले येथुन ताब्यात घेतले. त्यांनी खुन केल्याची कबुली दिली.