बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुखांना घातले साकडे.

इचलकरंजी : खमक्या वृत्तसेवा
इन्स्टाग्रामवर त्रोटक नावाने अकाउंट काढून, आपला धर्म लपवून इचलकरंजीतील सूरज शेख याने एका युवतीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी सदर युवकावर गुन्हा नोंद झाला असला तरी पीडितेलाच पोलिस ठाण्यात मारहाण करण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. त्यामुळे तिने आता गुन्हा रद्द करण्याची विनंती जिल्हा पोलिस प्रमुखांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
सुरज सलीम शेख याने आपली खरी ओळख लपवून तक्रारदाराशी जवळीक साधली आणि विवाहाचे आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवले. यानंतर त्याने तिचे फोटो सोशल मीडियावर अश्लील मजकुरासह व्हायरल करून तिची बदनामी केली. इतकेच नव्हे, बलात्कार करतानाचे व्हिडिओ गुपचूप रेकॉर्ड करून त्याचा वापर करून पुन्हा तिच्यावर अत्याचार केल्याचेही तिने निवेदनात नमूद केले आहे.
फिर्याद देताना दोन अनोळखी व्यक्तींनी पोलीस ठाण्यातच तिच्यावर तक्रार देऊ नये, यासाठी दबाव टाकल्याचे निवेदनात म्हटले आहे. हे सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घडल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे.
तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, संबंधित पोलीस ठाण्यातील महिला पोलीस के.के.पाटील यांनी तिला मारहाण केली ?, तसेच उपनिरीक्षक व तपास अधिकारी गोविंदा कोळेकर यांनी वारंवार आरोपीच्या बाजूने वक्तव्य केले आहे ?. त्यामुळे तिला तक्रार दिल्याचा पश्चात्ताप होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
पोलिसांनी अलीकडील बलात्काराच्या घटनेकडे दुर्लक्ष करून जुन्या घटनेचा आधार घेऊन गुन्हा नोंदवला आहे, पीडितेचा मोबाईल बेकायदेशीरपणे जप्त करून खाजगी माहिती तपासली जात असल्याचा आरोपही निवेदनात केला आहे.
या साऱ्या प्रकारांमुळे ती मानसिकदृष्ट्या खचली असून, “या प्रकरणात मला न्याय मिळण्याची आशा उरलेली नाही,” असे तिने नमूद केले आहे. त्यामुळे गुन्हा मागे घेण्याची विनंती तिने निवेदनात केली आहे.
“तपास प्रक्रियेत सहभागी होण्याची आता मानसिक तयारी नाही, त्यामुळे यापुढे मला पोलीस ठाण्यात बोलवले जाऊ नये,” अशी स्पष्ट भूमिका तिने आपल्या निवेदनात मांडली आहे.
तिच्या तक्रारीची प्रत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि पोलीस महासंचालक यांना पाठवण्यात आली आहे.

Pages: 1 2
