कोल्हापूर जिल्ह्यात बदलीस पात्र असणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेवरून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अनेकांनी बदली प्रक्रिया बाबतीत निराशा नोंदवली असल्याने जनकल्याण सेवाभावी संस्थेमार्फत पुढील काही दिवसात नुकत्याच झालेल्या बदली प्रक्रिये बाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आशाराणी पाटील यांनी “खमक्या”शी बोलताना दिली.