तरुण, युवक पिढीला मोठा धोका ! बेकायदा “भोग्या” व्यवसाय समुळ नष्ट करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक व स्थानिक पोलिसांसमोर आव्हान !
परिस्थितीचा अंदाज घेऊन गैरकृत्य करण्यास भाग पाडणारी “सखी” नामक टोळी कार्यरत असल्याची चर्चा ? पोलीस पर्दापाश करणार ?
जयसिंगपूर कुरुंदवाड : खमक्या वृत्तसेवा
शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर, मौजे आगर, नृसिंहवाडी, कुरुंदवाड, तेरवाड, जांभळी, कोडींग्रे, चिपरी हद्दीमधील परवानाधारक लॉजिंग अँड बोर्डिंग हॉटेलमध्ये दिवसा ढवळ्या “भोग्या” ठेवून अवैध व्यवसाय केला जात असल्याची चर्चा आहे.
तरुण पिढी बरबाद करणाऱ्या या व्यवसायाकडे मानवी तस्करी प्रतिबंधक कायदा विभागाचे कोल्हापूर पोलीस आणि शिरोळ, जयसिंगपूर तसेच कुरुंदवाड पोलिसांनी जाणीवपूर्वक “डोळेझाक” केली असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात असल्याचे कळते.
याशिवाय आर्थिक दृष्ट्या गंजलेल्या कुटुंबाचा शोध घेऊन, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने लागणाऱ्या मदतीचा अंदाज घेऊन, मध्यस्तीच्या माध्यमातून स्व-स्वार्थ साधण्यासाठी त्यांना गैरकृत्य करायला भाग पाडणारी तालुक्यात “सखी” नामक एक टोळी ?कार्यरत असल्याची चर्चा आहे. मानवी तस्करी प्रतिबंधक कायदा विभागाच्या पोलिसांनी याची खोलवर चौकशी केल्यास मोठे रॅकेट हाताला लागण्याची शक्यता वर्तवली जात असल्याचे समजते.
एकूणच लॉजिंग अँड बोर्डिंग हॉटेल व्यवसाय आणि टोळीच्या माध्यमातून सुरू असलेल्या व्यवसायामध्ये शिरोळसह वेगवेगळ्या ठिकाणच्या अनेक व्यक्ती गुंतल्या असल्याची चर्चा आहे. यापैकी काहींना बाधा झाली असल्यामुळे, तरुण वर्गाला भयंकर आजाराचा धोका वाढला असल्याचे समजते.
लॉजिंग अँड बोर्डिंग हॉटेल व्यवसायिक आणि भोग्या व्यक्ती, पोलिस आमचे काही करू शकत नाहीत, अशी बढाई मारण्याबरोबर, सगळ मॅनेज आहे, बिनधास्त रहा, घाबरू नका असा धिर, येणाऱ्यांना देत असल्याचीही चर्चा आहे. यावरुन लॉजिंग अँड बोर्डिंग हॉटेल व्यवसायिक आणि भोग्या व्यक्ती, सध्या पोलिस खात्याला “नाका पेक्षा मोती जड” आहे अशी गर्भित सुचना तर देत नसतील काय ? असा सवाल केला जात असल्याचे समजते.
नव्याने कार्यभार स्वीकारलेले जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना शिरोळ तालुक्यातील तरुण, युवक पिढीला भयंकर आजारापासून वाचवण्याबरोबर लॉजिंग अँड बोर्डिंग हॉटेल व्यवसायाआडून सुरू असलेला बेकायदेशीर “भोग्या” व्यवसाय समुळ नष्ट करणे एक आव्हान असणार असल्याचे जाणकार नागरिक बोलत आहेत.
“Bhogya” moves on the lodging and boarding hotel ?
Young, youth generation is a major threat! District Police Superintendent and local police challenge to destroy illegal “consumer” business!
Discussion that a gang named “Sakhi”, who is forced to do wrong, guessing the situation ? Will the police convey ?
Jaysingpur/Kurundwad: Khamkya News Service
It is reported that illegal business is being done at Jaysingpur, Mauje Agar, Narsinghwadi, Kurundwad, Terwad, Jambhali, Kondigree, Chipri boundary in Shirola taluka. Citizens are reportedly alleged that the Kolhapur police and Shirola, Jaysingpur and Kurundwad police have been “consciously” of the Human Traffic Prevention Act department. Apart from this, it is reported that a gang of “Sakhi” is working in the taluka that forced them to do self-esteem by searching for a financially rugged family, estimating the help they need in different ways. Police in the Human Traffic Prevention Act are believed to be in a deep inquiry. Overall, there is talk that many people from different places including Shirola are involved in the ongoing business through the lodging and boarding hotel businesses and gangs. Some of these are interrupted, because the young class is understood to have increased the risk of severe illness. There is also talk of a lodging and boarding hotel businessman and a person, with boasting that the police cannot do anything to us, all the manages, remain intact, do not be afraid. From this, the lodging and boarding hotel businessmen and the people, will not give the police department a pregnant suggestion that the police department is “heavy rather than the nose”? It is understood that such a question is being raised. Citizens are saying that the district police superintendent Yogesh Kumar Gupta, who has accepted the new charge, will be a challenge to destroy the illegal “consumer” business that started by the lodging and boarding hotel business in the Shirola taluka.