पिडित शेतकऱ्यांना “खेळकर” वृत्तीचे दर्शन देत, “शांत” राहून “काळे-काळे”भोर अक्षर खोडून त्यावर “काळी” “रेष” मारण्याची दिली जाते खात्री ?
शेतकऱ्यासाठी उदात्त हेतू ?, समातंर यंत्रणा ? 5 “लाख” मोलाची “प्रेम-माया” ? एक, दोन, तीन, चार नंबरवाले कोण ?
जयसिंगपूर : खमक्या वृत्तसेवा
कोणत्याही धरणासाठी भूसंपादित झालेल्या जमिनीची 1894 चे कलम (4) 1 चा आदेश, शेरा गुंडाळून तबदीली करायची असेल तर, 5 “लाख” मोलाची “प्रेम-माया” घ्या आणि चला जयसिंगपूरच्या समान यंत्रणेकडे ! असा अलिखित फतवा निघाल्याची चर्चा शिरोळ तालुक्यात सुरू असल्याचे समजते.
शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या जमिनी भुसंपादित होऊन अटकून पडल्या आहेत. त्या जमिनी प्लॉट पाडण्यायोग्य आहेत. अशी शेती बिगरशेती करून विक्री झाली तर, कोठ्यावधी रुपयांचा फायदा होणार आहे. असा उदात्त हेतू ठेवून एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर, चार नंबर वाल्यांनी संगनमताने योजना सुरू केल्याची चर्चा असल्याचे कळते.
नुकतेच, 20 ते 22 लाख रुपये गुंठ्याप्रमाणे जमिनीची विक्री होईल, अशा एकर जमिनीवरील भूसंपादनाचा शेरा कोणत्याही कागदपत्राविना कमी करून त्याची हस्तलिखित “डायरी”त पेनाने “मंजूर” अशी नोंद करण्यात आल्याची,चर्चा शेतकरी वर्गात असल्याचे समजते.
शेरा कसा कमी करण्यात येता ?, प्राधिकृत विभाग, अधिकाऱ्यांचा ना हरकत कागदपत्रे जोडने आवश्यक आहे का ? याच्या खात्रीसाठी जयसिंगरातील “त्या” तीन नंबरच्या व्यक्तीशी संपर्क साधला असता, त्यांनी बघावे लागेल, माहिती घ्यावी लागेल, असे नमुद केले.
भुसंपादनाचा शेरा कमी करून शेतकऱ्यांचा फायदा व्हावा, अशी आयडीया आज पर्यंत कोणीच वापरल्याची आणि समांतर यंत्रणा सुरू केल्याचे ऐकीवात नाही. परंतू, अलिकडी काळात जयसिंगपूरात एकाने, येणाऱ्या पिडित शेतकऱ्यांना “खेळकर” वृत्तीचे दर्शन देत, “शांत” राहून “काळे-काळे”भोर अक्षर खोडून त्यावर “काळी” “रेष” मारण्याची खात्री दिली जात असल्याची चर्चा सुरू आहे.
याशिवाय समातंर यंत्रणा हाताळणारे वाळू, दगड, क्रशर, एम् स्टँड, खडी, मुरुम, लाल-काळी माती खाण्यात मास्टर असून धादांत खोटे बोलणे, “खाजगी” तरूणांच्या माध्यमातून “लाख” मोलाची “प्रेम-माया” गिळंकृत करण्याची कामे करतात, अशी तालुक्यात चर्चा आहे.