गुगल मॅपद्वारे, 8 सप्टेंबर 2022 च्या अधिनयमानुसार अडीच महिन्यात प्रभाग रचना पुर्ण होणार.
प्रभाग रचना गोपनीय ठेवण्याचे आदेश, राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम प्रसिद्धी होणार.
शिरोळमध्ये एकूण 10 प्रभाग, सदस्य संख्या 20 तर, नगराध्यक्ष जनतेतून निवडला जाणार.
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या नगर विकास विभागाने महापालिका, नगरपालिका तसेच नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश पारित केले आहेत.
शिरोळ नगरपरिषदेकडे सध्या आठ प्रभाग आणि 17 सदस्य संख्या आहे. नव्याने तीन सदस्य वाढणार आहेत. त्यामुळे सन 2011 च्या जनगणनेनुसार 26,729 लोकसंख्येच्या तुलनेत 10 प्रभाग आणि सदस्य संख्या 20 होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रभाग रचना झिगझ्याक पद्धतीने होणार आहे. सध्या, असलेले प्रभाग क्रमांक बदलून नवीन प्रभाग क्रमांक निर्माण होणार आहेत. एका प्रभागातील मतदारांची संख्या 2,900 ते 3,200 या प्रमाणात राहील असा अंदाज आहे.
“खमक्या”तील अफीम गांजाचे वृत्त पोलिसांनी “हलक्यात” घेतले ?.
मागील काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. कोरोना आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्यामुळे निवडणुका खोळंबल्या होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार राज्य सरकारने प्रभाग रचनेचे आदेश दिले आहेत.
आदेशानुसार प्रभाग रचना गुगल मॅपद्वारे होणार असून यासाठी साधारण अडीच महिन्यांचा कालावधी लागणार आहे. दि.8 सप्टेंबर 2022 च्या अधिनयमानुसार प्रभाग रचना करण्यात येणार आहे.
एक अनाहुत पत्र : थु, तुझ्या नकली रूबाबावर, गावाचं लुटून घरात नेलास,
प्रभाग रचना करताना क्षेत्राची माहिती असणारा अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, नगर रचनाकार, संगणकतज्ज्ञ यांची समिती नेमण्याचे आधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. प्रारूप प्रभाग रचना तयार झाल्यानंतर ती राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेस सादर करण्यात यावी. त्यानंतर राज्य निवडणूक विभाग प्रभाग रचनेस मान्यता देणार आहे.
आयोगाच्या मान्यतेनंतर प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर हरकती सूचना मागविण्यात येणार आहेत. यावर सुनावणी घेऊन निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देण्यात येईल. अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होई पर्यंत, सर्व कामकाज, प्रभाग रचना गुप्त ठेवण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत.