नवीन नळ कनेक्शन घोटाळा, नविन पाणी योजनेत अक्षम्य ढिसाळपणा व अनियमितता ? आरे…नेमकं चाललयं तरी काय ?
घोटाळेबाजांना अद्दल घडविण्यासाठी आंदोलन अंकुशचे सोमवार दि.16 जून पासून नगरपरिषद समोर उपोषण.
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
शिरोळ नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी व त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या कामकाजावर वरिष्ठांचे लक्ष आहे की, नाही ? घरफाळा तफावत, घनकचरा घोटाळा, नवीन नळ कनेक्शन घोटाळा, आरोग्य विभागाचा बोगस, आनागोंदी कारभार, नविन पाणी योजनेत अक्षम्य ढिसाळपणा व अनियमितता ? आरे…नेमकं चाललयं तरी काय ? हे कधी आणि कोण थांबवणार ? अशी प्रत्येक प्रभागाच्या कोपऱ्या कोपऱ्यावर सवालात्मक चर्चा सुरू असल्याचे समजते.
धनाजी चुडमुंगे, अक्षय पाटील यांच्या बरोबर अन्य पध्दाधिकारी नगरपरिषदेच्या चालढकलपणाविरूध्द सोमवार पासून उपोषण करणार आहेत, नगरपरिषदेला काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार आहे.आता सुट्टी नाही. अशी चर्चा युवक, तरूण वर्गाबरोबर वयस्क नागरीकांत रंगल्याचे समजते.
दरम्यान, आंदोलन अंकुशने न.प. प्रशासनाला निवेदन देवून उपोषणाचा इशारा दिला आहे. उपोषण पार्श्वभुमीवर अंकुशने सोशल मिडियावर व्हायरल केलेल्या पोस्टवरून सध्या, शहरात जोरदार चर्चा आहे. पोस्ट मध्ये अंकुशने मुख्याधिकारी यांना सवाल केला आहे की,
“भ्रष्टाचार”.. हा आपला “शिष्टाचार” समजायचा का ?, शिरोळ नगरपरिषद मध्ये नवीन पाणी योजनेवर परस्पर कनेक्शन देऊन “घोटाळा” झाला म्हणून आम्हीच सांगायचे का ?, घोटाळ्याची चौकशी करा म्हणून उपोषण आम्हीच करायचे का ?, गावभर फिरून चौकशी व्यवस्थित होईल यासाठी आम्हीच राबवाययचे का ?, अहवालातील त्रुटी आम्हीच निदर्शनास आणून द्यायच्या का ?, आर्थिक घोटाळा उघड झाला, दोषीवर गुन्हा दाखल करा म्हणून आम्हीच उपोषण करायचे का ?
भ्रष्टाचाराबाबत नगरपरिषद प्रशासन किती गंभीर आहे ? पैसे खाल्लेल्यांना अधिकारी का वाचवत आहेत ? अहवाल घेऊन या, किती रक्कमेचा घोटाळा आहे, कोण जबाबदार आहे, याचे पुरावे द्या लगेच फिर्याद घेतो असे म्हणणारे पोलीस, पुरावा, अहवाल दिल्यानंतर सुद्धा गुन्हा दाखल करायला टाळाटाळ करत असतील तर भ्रष्टाचार करणाऱ्यांना कोण धडा शिकवणार ?
असा सवाल करून घोटाळेबाजांना अद्दल घडविल्याशिवाय थांबणार नाही. असा इशारा अंकुशने पोस्टमध्ये दिला आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी
अहवालानुसार भ्रष्टाचार करणाऱ्यांवर शिरोळ पोलिसात फिर्याद देऊन गुन्हा दाखल करावा, अन्यथा सोमवार दि.16 जून पासून शिरोळ नगरपरिषद समोर उपोषण केले जाईल, असे पोस्टमध्ये म्हटले आहे.