तुमचा काय संबंध ? तुम्ही सांगता म्हणून तांबे सरांवर गुन्हा दाखल करू का ? तुम्ही कोण सांगणार ? असा पुनम मानेंनी उलट सवाल केल्याचे तक्रारीत नमुद.
स.पो.नि. पुनम माने यांच्या अडचणीत भर पडणार ? वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता बळावल्याची इचलकरंजी शहरात चर्चा.
इचलकरंजी : खमक्या वृत्तसेवा
इचलकरंजी तांबे अकॅडमी मधील यश यादव याचा मृत्यू संशयास्पद असून श्रद्धा इन्स्टिट्यूटचे प्रमुख आप्पासाहेब तांबे याच्या हस्तक्षेपामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने यांनी पुरावा नष्ट करून खुनाची घटना दडपली आहे. पोलीस अधिकारी माने यांची भूमिका व वर्तणूक संशयास्पद आहे.सहा महिन्यापूर्वी तांबे अकॅडमीमध्ये कौंदाडे मॅडम हिने एका विद्यार्थिनीला बेदम मारहान केली, नैराश्यातून मुलीने आत्महत्या केली आहे. सदरचे प्रकरण तांबे यांनी दडपले आहे.
तरी यश याच्या संशयास्पद मृत्यूचा तपास सीआयडीमार्फत करण्यात यावा अशी मागणी मयत यश याची आई आसारानी अजित यादव, रा.चौंडेश्वरी कॉलनी पलूस, जिल्हा सांगली यांनी कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तक्रारीनुसार प्रत्येक मुद्द्याच्या अनुषंगाने चौकशी करण्यात येईल असे पिडितांना आश्वासन देऊन पोलीस अधिकारी पुनम माने यांना, असे प्रकार घडतातच कसे ? असा जाब विचारल्याची माहिती समजून येत आहे. चर्चेत असलेल्या माहितीनुसार सदर घटनेचा तपास गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे दिला असल्याचे समजते. एकूणच सुरू असलेल्या हालचालीवरून पुनम माने वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता बळावली असल्याची इचलकरंजी शहरात चर्चा आहे.
मयत यश हिची आई आसावरी यांनी उपस्थित केलेल्या मुद्दातून गावभाग पोलिस, तांबे यांची पाठराखण करीत असल्याचा संशय बळावत असल्याचा आरोप होत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पुनम माने यांच्या कामकाज पद्धतीवर कडाडून ताशोरे ओढले आहेत.
जाणीवपूर्वक आत्महत्या अशी नोंद करणे ,परिस्थितीजन्य पुरावे व परिस्थिती संशयास्पद असणे, आत्महत्या कधी केली याची स्पष्टता नाही. मुले, कर्मचारी यांची जाणीवपूर्वक चौकशी नाही जबाब नोंदवण्यात आले नाहीत.
गणवेशाच्या टायने आत्महत्या केली असे पोलीस सांगत आहेत. पण, त्या ठिकाणी हँगरला दोरी अडकलेली दिसते ,मुलाचा गळफास कोणी काढला ? त्याला दवाखान्यात कोणी व किती वाजता आणले ? याची चौकशी झालेली नाही.पोलिसांना वर्दी तब्बल एक तासाने उशिरा का देण्यात आली.
सहा. पोलीस निरीक्षक पूनम माने यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला नाही, फोटो नाहीत. बाथरूम परिसरात स्वच्छता करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पूनम माने यांनीच घटनास्थळाचे पुरावे नष्ट केले आहेत, यशने टायने गळफास घेतला, असे पोलीस सांगत आहेत. प्रत्यक्षात टाय त्याच्याच शर्टला आहे, दुसरा टाय घरी आहे. असे असताना यशने कोणत्या व कोणाच्या टायने आत्महत्या केली. याचा तपास झालेला नाही.
यश हा रात्री दीड पर्यंत रेक्टरशी बोलत होता असे रेक्टर यांनी स्वतः सांगितले आहे, डॉक्टर, पोलीस अधिकारी यांच्याशी नेमके काय बोलणे झाले याचा सिडीआर डिटेल मागवून कसून चौकशी करण्यात यावी.कोणतेही पुरावे गोळा केले नसताना तेथे स्वच्छता करण्यात आली. व पुरावे नष्ट करण्यात आले याबाबत पूनम माने यांना विचारले असता तुमचा काय संबंध ? ते ठरवण्याचा अधिकार मला आहे अशी बेजबाबदारीपणाची उत्तरे दिली.
तुम्ही सांगता म्हणून मी तांबे सरांच्या वर गुन्हा दाखल करू का ? तुम्ही कोण सांगणार ? असा उलट सवाल त्यांनी आम्हाला केल्याचे तक्रार निवेदनात म्हटले आहे. एकूणच मयत यश याच्या आईने उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे गावभाग पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पुनम माने यांच्या अडचणीत भर पडणार असे स्पष्ट दिसत असल्याची चर्चा आहे.