प्रकरण रफादफा करण्यासाठी मनोरूग्न महिलेला गायब करुन तिला रत्नागिरी मनोरुग्णालयात दाखल करण्याचा प्लॅन !
उदगाव स्मशान भूमीतील नेमकी खरी वस्तुस्थिती काय आहे ? अर्धनग्नावस्थेत बसलेली मनोरुग्ण महिला कोण ?
उदगाव : खमक्या वृत्तसेवा
उदगाव (ता.शिरोळ) येथील स्मशानभूमीत काळी जादू, नग्न विधी भानामतीचा प्रकार केल्याच्या घटनेची खरी वस्तुस्थिती नेमकी काय आहे ? याबाबत जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिक अनभिज्ञ असल्याची खळबळ जनक माहिती चर्चेत आली आहे.
खरी वस्तुस्थिती काय आहे याबाबतची माहिती घेतली असता आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. टीआरपी वाढवण्याबरोबर यापुर्वी त्याच महिलेवर “अतिप्रसंग” केल्याची चर्चा असणाऱ्या जवळच्या मित्राला वाचवण्यासाठी अंधश्रद्धेच्या नावाखाली “उदगाव” बरोबर “कोल्हापूर” जिल्ह्याला बदनाम करण्याचा संगणमताने घाट रचल्याची खळबळ जनक घटना चर्चेत आली आहे.
या प्रकाराबाबत ग्रामपंचायतीचे सरपंच सलीम पेंढारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही तसेच व्हाट्सअप वर पाठवलेल्या मेसेजला उत्तर दिले नाही. ग्रामसेवक अनिल बिडकर यांच्याशी संपर्क साधला असता मीडियावाल्यांनी काय केले आहे, ते त्यांनाच माहिती असे बोलून म्हणाले,
सीसीटीव्ही कॅमेरे खराब झाले आहेत. कोणते फुटेज घेतले आहेत किंवा दिले आहेत हे माहीत नाही. मात्र ती महिला मनोरुग्ण असून उदगाव गावात पुलाच्या पलीकडे, अलीकडे, स्मशानभूमीत आणि इतर ठिकाणी वावरताना नेहमी दिसते. अधिक माहितीसाठी चेतन कोरे यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले.
कोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या, प्रसिद्ध झालेले फुटेज दोन महिन्यापूर्वीचे आहेत. वेगवेगळे प्रकार घडतात. इथे नैवेद्य ठेवायला, पूजा करायला लोक येत असतात. पाच-सहा दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेत एकटीच महिला कट्ट्यावर बसली होती. तिच्या अंगावर साडी होती. परंतु, ती 75 टक्के नग्न दिसत होती. ती पेटते लाकूड घेऊन माझ्या मागे लागल्यानंतर मी, घाबरून पोलीस पाटील आणि पोलीस 112 ला फोन केल्याचे सांगितले.
सध्या, या अंधश्रद्धा प्रकरणाची जिल्हास्तरावरून गंभीर दखल घेण्यात आली आहे. पुरावे, सीसीटीव्ही फुटेजसह अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खरंतर स्मशानभूमीत घडलेली वस्तुस्थिती वेगळी असताना दिशाभुल करणारी खोटी प्रसिद्धी केल्याची चर्चा उदगावात आहे.
पोलीस प्रशासनाच्या चौकशीत खरी वस्तुस्थिती बाहेर पडू नये, “अतिप्रसंग” करण्यासाठी गेलेल्या मित्राला वाचवण्यासाठी केलेली टगेगिरी अंगाशी येवू नये, त्यासाठी भाडखाऊ “संत्या” आणि त्याच्या त्या मित्राने, घटनेतील महिलेचा शोध घेवून तिला रत्नागिरी येथील मनोरुग्णालयात दाखल करून, गायब करायचे प्रकरण रफादफा करण्याचा प्लान रचल्याची चर्चा आहे.