अलमट्टी धरण व हिप्परगी बंधाऱ्यावर महाराष्ट्र पाटबंधारे विभागाच्या समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक.
यंदाची चौथी ‘पूर परिषद’ रविवार, 6 जुलै रोजी कुरुंदवाड येथील कृष्णा संगम घाटावर सांयकाळी 4 वाजता.
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व राजकीय नेते, मंत्री, लोकप्रतिनिधी यांनी महापुराच्या पार्श्वभूमीवर नागरी हिताच्या दृष्टीने हाताची घडी तोंडावर बोट ठेवून केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप होत असतानाच एकटे “आंदोलन अंकुश”च महापुराचा किल्ला लढवत असल्याचे सर्वदूर चित्र आहे.
महापुराच्या अनुषंगाने बारीक-सारीक बाबी प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन नागरी हिताचे कार्य निरंतर सुरू ठेवले आहे. अलमट्टी धरण व हिप्परगी बंधाऱ्यावर महाराष्ट्र जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी लावून धरून समन्वय अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यास भाग पाडले.
कर्नाटक सरकार कडून आलमट्टी धरणातील पाणी साठा व विसर्ग याबाबतीत दिशाभूल करणारी आकडेवारी महाराष्ट्राला दिली जाते. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र पाटबंधारे विभागाने सेवेत असलेले जबाबदार अधिकारी नेमावेत अशी मागणी केली होती. आता खरी आकडेवारी मिळणार असल्यामुळे महापूर टाकणे शक्य होणार आहे.
त्याचबरोबर हिप्परगी बंधाऱ्याचे दरवाजे पावसाळ्यात खाली घेता येत नाहीत. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पाणी फुग येते. हा आक्षेप मान्य करून शासनाने पहिल्यांदाच हिप्परगी बंधाऱ्यावर पाटबंधारे अधिकाऱ्याची नेमणूक केल्याचे आदेश काढले आहेत.हिप्परगीवर जादा लक्ष दिल्यास महापूर नियंत्रण होऊन महापुराची तीव्रता कमी होण्यास मदत होईल असे आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.
नितिन ने. भोजकर (9028244344), नितेश ब. रानमाळे (8275268026) , अनिल आ.पवार (9834573449), सचिन सु. सुतार (8329926012), मोहन रा.गळंगे (9511671722), श्रेणीक सु. दुधगावे (8806507237), सुशिलकुमार बा. गायकवाड (9325634329), अश्विनकुमार बा. कर्नाळे (9404260656) या अधिकाऱ्यांची प्रति सहा दिवस याप्रमाणे अदलाबदली करून अलमट्टी धरण व हिप्परगी बंधार्यावर नियुक्ती करण्यात आली आहे.
यंदाची चौथी ‘पूर परिषद’ रविवार, 6 जुलै रोजी कुरुंदवाड येथील कृष्णा संगम घाटावर सांयकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आंदोलन अंकुश संघटना व कृष्णा पूर नियंत्रण समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी आंदोलन अंकुशचे तालुकाध्यक्ष दिपक पाटील, राकेश जगदाळे, निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार, निवृत्त जिल्हा अभियंता प्रदिप वायचळ, कृष्णा पूर नियंत्रण समितीचे संजय कोरे, निमंत्रक सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता कुमार तिप्पाणावर संभाजी शिंदे, नितिन घोरपडे अवधूत काळे, गोपाळ चव्हाण, दिलीप माने, अनिल हुपरीकर, रघु नाईक, उद्धव मगदूम शिवाजि काळे चंद्रकांत पाटील महादेव काळे विशाल पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.