“अतिप्रसंग” करण्याची घटना लपवण्यासाठी भानामतीचा प्रकार पुढे आला ? जुने अस्पष्ट “फुटेज” आणि “स्क्रिप्ट” कोणी पुरवली ?
“अतिप्रसंग” करण्याचा प्लॅन फसला, पळून जाणारा भाडखाऊ “संत्या”चा तो मित्र कोण ? पोलिसांनी तपास करून गुन्हे दाखल करावेत.
उदगाव : खमक्या वृत्तसेवा
उदगाव स्मशानभूमीतील घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मागणाऱ्या पोलिसांना तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज कशाला हवे आहेत ?, ती महिला कशाला हवी आहे ?अशी भाषा करून भाडखाउ “संत्या” नामकाने पोलिसांचे लक्ष विचलित केल्याची चर्चा उदगावात आहे.
यापूर्वी मनोरुग्ण महिलेवर “अतिप्रसंग” झाल्याची चर्चा असताना स्मशानभूमीत बसलेल्या त्याच महिलेवर दुसऱ्यांदा अतिप्रसंग करण्याचा डाव फसलेल्या मित्राने सदर प्रकरणाला वेगळी दिशा देण्यासाठी कोणाला फोन केला ? किती पैसे दिले ? जुने आणि अस्पष्ट दिसणारे सीसीटीव्ही फुटेज आणि स्क्रिप्ट कोणी कोणाला पुरवली याचाही तपास पोलिसांनी करण्याची आवश्यकता असल्याची चर्चा उदगाव गावात आहे.
उदगावची बदनामी करणारा मुख्य सूत्रधार भाडखाऊ “संत्या” नामकाने, भानामती, काळी जादू, अंधश्रद्धा या प्रकाराच्या वस्तुस्थितीचे पुरावे गोळा करून अहवाल सादर करण्याच्या तयारीत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना, खरा आणि वस्तुनिष्ठ अहवाल दिला तर तुमचे दोन नंबरचे धंदे बंद पाडणार, पेपरात व टीव्हीवर बातमी प्रसिद्ध करणार. असा दम त्रयस्थ व्यक्तीकडून भरल्याचे समजते.
स्मशानभूमीमध्ये जी महिला सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दिसून आली आहे. ती महिला मनोरुग्ण असून उदगाव व परिसरात वणवण फिरत असल्याचे अनेकांनी, अनेक वेळा पहिल्याची चर्चा आहे. या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झालेले वस्तुनिष्ठ पुरावे उदगाव गावच्या सरपंच यांनी जाहीर करण्याची आवश्यकता असल्याचे नागरीक बोलताहेत असे समजते.
सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या मनोरुग्ण महिलेवर यापुर्वी “अतिप्रसंग” झाल्याचे लोक बोलतात. त्याच पध्दतीने तिच्यावर स्मशानभूमीत पुन्हा “अतिप्रसंग” करण्यासाठी भाडखाउ “संत्या”चा मित्र गेल्याची चर्चा असून महिलेच्या विरोधामुळे त्याचा डाव असल्याची स्मशानभूमी व उदगाव परिसरात बोलले जात आहे.
पोलीस व्हॅन स्मशानभूमीत आली त्यावेळी संबंधित महिलेने आपल्या अंगावरील कपडे व्यवस्थित करून , छत्री घेऊन स्मशानभूमीतून एकटीच बाहेर पडल्याचे पोलिसांसह अनेकांनी पाहिले. तिच्यासोबत कोणताही पुरुष किंवा युवक नव्हता, तिच्याकडे कर्मकांड किंवा अघोरी कृत्य करण्याचे कोणतेही साहित्य दिसून आले नाही, शिवाय पोलिसांनाही ती मनोरुग्ण असल्याची खात्री झाल्याचे नागरिक सांगत असल्याचे कळते.
स्मशानभूमीत मृतदेहाला अग्नि दिल्या जाणाऱ्या कट्ट्यावर मध्यभागी बसलेली मनोरुग्ण महिला कोणाला पाहून चिडली ? स्वतःला वाचवण्याचा का प्रयत्न करू लागली ? “अतिप्रसंग” करण्याचा प्लॅन फसला म्हणून तिथून पळून जाणारा भाडखाऊ “संत्या”चा तो मित्र कोण ? याचा पोलिसांनी तपास करून दोघांवरही गुन्हे दाखल करावेत अशी मागणी उदगाव ग्रामस्थांकडून होत असल्याचे समजते.