उदगाव स्मशानभूमीतील अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार कधीचा ? दोन महिण्यापुर्वीचे फुटेज ? आत्ताचे फुटेज कुठे आहेत ?
स्मशानभूमीत भानामती सारखा विधी करत असताना वापरण्यात आलेले साहित्य पोलिसांना मिळाले आहे का ?
उदगाव : खमक्या वृत्तसेवा
उदगाव स्मशानभूमीत उघडकीस आलेला अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार कधीचा आहे ?,अशा घटनेबाबत ग्रामपंचायतीने जयसिंगपूर पोलिसांना कोणत्या पत्राद्वारे माहिती व तक्रार दिली ? कॅमेरामध्ये कैद झालेले महिला व पुरुष प्रथम वर्षश्राद्धचा नैवेद्य घेऊन आले होते का ? त्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट का दिसतात ? गेली अनेक महिने असा किळसवाना प्रकार होत असेल तर, भर दिवसा अशा पद्धतीचे अघोरी कृत्य केले जात असताना स्मशान भूमीतील वॉचमन काय करीत होता ?
स्मशानभूमीत भानामती सारखा विधी करत असताना वापरण्यात आलेले साहित्य पोलिसांना मिळाले आहे का ?, ते त्यांनी जप्त केले आहे का ?,आत्तापर्यंत कोणा कोणावर कारवाई झाली ? अशा विविध प्रश्नांच्या उत्तरातून भानामती, काळी जादू सारख्या अघोरी अंधश्रद्धेच्या कृत्याला पुष्टी मिळेल, अन्यथा टीआरपी वाढवण्यासाठी केलेला हा खटाटोप केला असल्याचे शिक्कामोर्तब होईल.
उदगाव स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार केलेल्या जागेवरील रक्षा बाजूला सारून त्याठिकाणी बाहुली, नारळ यांची पूजा केली जात होती. तसेच, वेगवेगळ्या नावाच्या चिठ्ठ्यांना सुया टोचून करणी, बाधा करण्याचा प्रकार उघडकीस आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, अघोरी कृत्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू पोलिसांनी जप्त केल्या असल्याचा दुजोरा मिळत नाही.
उदगाव स्मशानभूमीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सर्व किळसवाणा प्रकार कैद झाल्याचा दावा आहे. पण या फुटेजच्या आधारे पोलीस अधिक तपास करत असल्याचे कुठेच दिसत नाहीत. अशा घटना टीआरपी वाढवण्यासाठी केल्या ?, की, मित्राला वाचवण्यासाठी केल्या ? याची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
फुटेजच्या आधारे पोलीस अधिक तपास करत असतील तर त्यांना घटनास्थळावर मिळालेले साहित्य, व्यक्तींचे फोटो (कोणी काढले असतील तर ), पंचनामा, अंधश्रद्धा निर्मुलनचे साक्षीदार, जबाब नोंदवावे लागतील तरच या अंधश्रध्दा प्रकाराला मुळासह उपटून टाकणे शक्य होणार आहे.