टग्या “परश्या” व “अनिलराव” यांच्यात माया, प्रतिष्ठा, मनोवृतीवरुन सुरू असलेल्या डाव-प्रतिडावामुळे संबधीत पेचात.
3 लाख मोलाची माया परत देईन पण, “अनिलराव” यांना एक चिंचुका सुध्दा देणार नाही, टग्या परश्याचा “आझाद” मैदानावर शड्डू.
शिरोळ/ जयसिंगपूर : खमक्या वृत्तसेवा
“काळे-काळे”भोर अक्षर काढून “अध्यक्ष” म्हणून स्वाक्षरी करणाऱ्या जयसिंगपूरच्या “परश्या” तथा “राज” नामक टग्याने, स्वतः तालुक्याचा बॉस असल्याच्या अविर्भावात संबधिताकडून 3 लाख मोलाची “माया” घेतल्याची चर्चा आहे. त्यापैकी फक्त 25 हजार “माया” घेऊन शिरोळच्या भव्य, दिव्य आणि खाजगी लोक (उमेदवार) काम करीत असलेल्या इमारतीत एन्ट्री केल्याचे लोक बोलतात.
हात धरणारा अजून जन्माला यायचा आहे, असे वारंवार ठणकावून सांगणारा तो . “परश्या” टग्या, दक्षिणेकडे तोंड करून, उंचावर बसणाऱ्याच्या समोर येऊन उभा राहिला. काम करावं लागणार आहे, असे बोलून 25 हजाराची माया हातावर ठेवून, 2.75 लाख मोलाच्या मायेचा “ढपला” पाडून पोबारा करण्याच्या तयारीत होता, अशी वर्तुळात चर्चा आहे.
परंतु, कोणत्याही कामात, अडचणीत कधीही “तह” करीत नाहीत. जाम “सिल” ठोकून भ्रष्टाचारी व्यक्तीसाठी कायमचे “दार” बंद करणार, आणि “खोटे” न बोलता, “खेळकर” वृत्तीने सर्वांना “मेरिट” नुसार वागणूक देणार, अशा शिस्तबद्ध वागण्यासाठी सुप्रसिद्ध असलेले “अनिलराव” सुद्धा, त्या टग्या “परश्या” पेक्षा एक “काकाण” चढ असल्यामुळे त्यांनी सगळाच डाव उलथवून लावला.
जाड पुट्ट्यावरचे सगळे कागद, बरेच महिने खालच्या बाजूला ठेवून त्याला चांगलीच “उब” दिली. शुक्रवारी दिवसा बारा वाजण्याच्या सुमारास अचानक एक फोन आला, आणि “अनिलराव” गडबडीने दक्षिण मुखी दरवाजातून बाहेर पडून जयसिंगपूरच्या दिशेने गेल्याचे उपस्थितांनी बोलून दाखवल्याचे समजते.
2.75 लाख मोलाच्या मायेचा “ढपला” पाडण्याच्या तयारीत असलेल्या टग्या “परश्या”ला उलथं-पालथ करण्याची वेळ आणि डाव, संधी त्यांनी साधली. उदगाव मुख्य रस्त्यावरील शेतात उभा राहून टेहाळणी केली. पण, मनात “परश्या” बद्दल चिड होती. त्यामुळे पुन्हा डाव टाकूण कागदी घोडे नाचवण्याची इच्छा स्पष्ट केली.
“अनिलराव” यांच्या धूर्त खेळीमुळे आता टग्या “परश्या”च्या अडचणीत भर पडल्याची चर्चा जयसिंगपूर शहरात सुरू झाली आहे. पण, टग्या “परश्या”ने सुद्धा कर्म भूमीतील सिद्धेश्वर देवाची शपथ घेवून, एक वेळ 3 लाख मोलाची माया परत देईन पण, अनिल रावांना मायेतील एक “चिंचुका” सुध्दा देणार नाही असा शड्डू “आझाद” मैदानावर मारल्याची चर्चा असल्याचे समजते.