पोलिसात अर्ज दिलेले हे दोन तक्रारदार, नेमका खोटा बनावट दस्तऐवज कोणी केला ?
शासकीय “व्हाउचर”ची बनावट कॉपी केली; पण मूळ पावतीही पोलिसांना देण्याचा महामूर्खपणा केला.
पोलीस, प्रशासन यंत्रणेचा “मी” बाप आहे, या प्रवृत्तीने कर्मचाऱ्यांचा घात.
कोल्हापूर: अक्षय पाटील
शिरोळ तहसील कार्यालयाचे जे वादग्रस्त जाहिरात बिल शरद काळे यांनी हडप केले, अशी खोटी तक्रार देऊन त्यांच्यावर अपहाराचा गुन्हा नोंद करण्यात आला, ते पैसे प्रत्यक्षात वसुली प्रतिनिधी सागर कोळी यांनी स्वीकारल्याचे व्हाउचर तहसील कार्यालयाने पुढारीस दिले. पण शरद काळे यांना तुरुंगात टाकायचे, असे कुंभाड रचलेल्या प्रशासनाने त्या व्हाउचरची बनावट कॉपी केल्याचा प्रताप चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे पोलीस, प्रशासन यंत्रणेचा “मी” बाप आहे, या प्रवृत्तीने आतापर्यंत अनेक कर्मचाऱ्यांचा घात केला असला तरी प्रशासनाचे काळे कारनामे जनतेसमोर आणण्याचा विडा शरद काळे यांनी उचलला आहे.
वार्ताहरांच्या गळ्याला फास लावण्यासाठी बनावट रेकॉर्ड करण्यापर्यंत मजल! या मधळ्याखाली “खमक्या” मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो वाचकांनी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधत, दैनिक पुढारीचे तत्कालीन वार्ताहर शरद काळे यांच्या बाबतीत तक्रारदार शिवाप्पा कुंभार याने पोलिसांकडे सादर केलेल्या बनावट रेकॉर्ड बाबत आश्चर्य व्यक्त करून घृणा व्यक्त केली.
स्वहितासाठी वार्ताहरांना बेकायदेशीररित्या जाहिरातीच्या नावाखाली पैसे गोळा करण्याची जबरदस्ती करून, पोलीस यंत्रणेवर दबाव वाढवून, शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना हाताशी धरून, बनावट दस्ताऐवजांच्या माध्यमातून वार्ताहरांचा कांड करण्याची प्रवृत्ती त्या माध्यमाला जडल्याचे शरद काळे प्रकरणावरून स्पष्ट झाले आहे.
शिरोळ तहसील कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या जाहिरातीची 15,566 रु. ही रक्कम दैनिक पुढारीचे वसुली प्रतिनिधी सागर कोळी यांनी व्हाउचर वर स्वतःचे नाव लिहून, सही करून, मोबाईल नंबर टाकून स्विकारल्याचे अधिकृत व्हाऊचरवर दिसून येते. व्हाऊचरवर, समोर म्हणून तहसिलदार शिरोळ करीता तत्कालीन नायब तहसिलदार योगेश जमदाडे यांनी स्वाक्षरी केली आहे. (सदर व्हौचरची प्रत खाली वाचकांच्या माहितीसाठी जोडण्यात आली आहे). पण शरद काळे यांचे लिखाण पचनी न पडल्याने काहीही करा पण त्यांना तुरुंगात टाका, असे आदेश निघाले.
त्यासाठी त्याच शासकीय व्हाउचर मध्ये बनावटगिरी करण्याचा प्रताप कोण केला, कोणाच्या सांगण्यावरून केला याच्या चौकशीची मागणी आता शरद काळे योग्य ठिकाणी करणार आहेत. बनावट व्हाऊचरची डुप्लिकेट प्रत तयार करून त्यावर बनावट सही करून त्या खाली, सदर बिल शरद काळे यांच्याकडे रोख जमा केलेले आहे, असे स्वहस्ताक्षरात नमुद करण्यात आले. म्हणजे ज्यांनी आतापर्यंत अन्याय सहन केला, त्यांच्या बाबतीत अशीच कट कारस्थाने केल्याचे स्पष्ट होते.
केलेला तो बनावट दस्तऐवज कुंभार याने पोलिस दप्तरी सादर केल्याचे दोषारोप पत्रातील कागदपत्रावरून स्पष्ट होत आहे.वसुली प्रतिनिधी सागर कोळी यांनी जाहिरातीची रोख रक्कम आस्थापनाकडे जमा करायची आहे. ती शरद काळे यांना दिली, असे खोटे रेकॉर्ड करण्यामागे शरद काळे यांना कोणत्याही थराला जाऊन धडा शिकवणे, हाच डाव होता, हे आता उघड झाले आहे.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं, असा प्रत्यय शरद काळे प्रकरणात आला आहे. पण चोर चोरी करताना काहीतरी पुरावे मागे सोडतो, तसे काहीसे प्रशासनाचे किंबहुना तक्रारदार शिवाप्पा कुंभार व जाहिरात मॅनेजर जावेद शेख यांचे झाले. त्यांनी डुप्लिकेट आणि ओरिजनल असे दोन्ही व्हाउचर पोलिसांत हजर केले. पोलिसांवरही इतका दबाव होता की, त्यांनीही खातरजमा केली नाही. त्यांनीही ते थेट कोर्टात हजर केले. कदाचित, प्रशासनाचे काळे कारनामे कोर्टाच्याही नजरेस यावेत, असेच नियतीच्या मनात असावे.
पुढील भागात
(शरद काळे यांनी कोणती तक्रार दिली, दिलेल्या तक्रारीची चौकशी होणार की, बड्या धेंडांना पाठीशी घालणार?)