स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे असताना, भानामतीचा प्रकार करण्याचे धाडस करतील काय ?
मनोरुग्ण महिला कुठे गायब झाली ? तिला कोणी गायब केले ? ती सध्या रत्नागिरीत आहे का ? याचा पोलिसांनी सखोल तपास करावा.
उदगाव : खमक्या वृत्तसेवा
उदगाव तालुका शिरोळ येथील स्मशानभूमीत “त्या” दिवशी कोणता भानामतीचा प्रकार घडला ?, दोन ते चार महिन्यापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल करून कोल्हापूर जिल्ह्याबरोबर उदगावची बदनामी करण्यात “संत्या” नामकाचा हात असल्याचे जवळपास स्पष्ट झाल्याची चर्चा आहे.
उदगाव स्मशानभूमीत त्यादिवशी कोणताही अघोरी प्रकार घडला नसताना केवळ भाडखाउ “संत्या” नामकाने “टीआरपी” साठी भानामतीची घटना घडल्याचे प्रसिद्धकरून एक दिवसासाठी पाठ थोपटून घेण्याचे घाणेरडे कृत्य केल्याचे लोक बोलत असल्याची चर्चा आहे.
उदगाव स्मशानभूमीत वावरणाऱ्या मनोरुग्ण महिलेचे व्हायरल झालेले सीसीटीव्हीमधील कैद चित्र
“खमक्या” मध्ये वस्तूनिष्ठ वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महिला राज्य आयोगाने कोल्हापूर जिल्हा अधीक्षक व कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना सदर घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा आणि संबंधित आवर कारवाई करावी असा पत्र व्यवहार केला आहे. या पत्रव्यवहारानुसार जयसिंगपूर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
मनोरुग्ण महिलेवर अतिप्रसंग, बलात्कार ? अशा दुर्दैवी घटनावर पांघरून घालण्यासाठी संत्या व त्याच्या नातेवाईक, मित्रांनी संगणमताने भानामतीचा प्रकार पुढे आणून अख्ख्या महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात बरोबर उदगाव आणि शिरोळ तालुक्याची बदनामी केल्याचा आरोप नागरिक करीत असल्याचे समजते.
अतिप्रसंगाच्या भीतीपोटी मनोरुग्ण महिलेने केलेल्या विरोधानंतर, भानामतीचा प्रकार पुढे आला. आणि त्यानंतर मनोरुग्ण महिला गायब झाली. या महिलेला कोणी गायब केले ? यामध्ये कोणाकोणाचा हात आहे ? महिलेला रत्नागिरी येथे सोडण्यात आले का ? सीसीटीव्ही फुटेज मध्ये छेडछाड करण्यात आली आहे का ?, केली असेल तर, ती, कोणी केली ? याची पोलिसांनी सखोल चौकशी करावी. अशी मागणी शिरोळ तालुक्यातून होत आहे.
उदगाव भूमीतील व्हायरल झालेल्या सीसीटीव्हीमधील चित्रात दर्शन घेणारा व्यक्ती.
पोलिसांनी “संत्या”ला बोलावून घेवून जाब विचारल्यानंतर, त्याने संबधीच्या मोटार गाडीतून बाहेर जाऊन त्या ठिकाणी, तुमची चार प्रकरणे काढू काय ? अशी भाषा भाडखाऊ “संत्या”ने वापरल्याची आजही चर्चा आहे. या चर्चेमध्येच “संत्या”सारख्या भाडखाउ खंडणीखोराला “खाक्या” घाबरू लागला की काय ? असा सवालात्मक सुर असल्याचे समजते.
चौकशीच्या अनुषंगाने जयसिंगपूर पोलिसांनी उदगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सलीम पेंडारी यांना वस्तुनिष्ठ जबाब नोंदवण्याकरिता नोटीस जारी केली आहे. आता पेंढारी यांना भानामतीचे षडयंत्र रचण्यात आले की, भानामतीचा प्रकार घडला ? याची स्पष्टोक्ती देण्याबरोबर यामधील सहभागी लोकांची नावे पोलिसांना देणे अनिवार्य आहे.
उदगाव स्मशानभूमी आणि त्या दिवशी झालेली भानामती काळी जादू या प्रकाराचा दुरान्वये सुद्धा संबंध नसल्याचे लोक बोलत आहेत. मात्र, स्मशानभूमी, मनोरुग्ण महिला, “अतिप्रसंग” या घटनेचा चिंचवाड रोडवरील, राम मंदिर परिसरात वास्तव्य करणारा एका “अस्सल पिंडका” इसम व “संत्या”चा जवळचा मित्राचा घनिष्ठ संबंध असल्याची जोरदार चर्चा असल्याचे समजते.