एकाच जाहिरात बिलाचे तहसील कार्यालयाचे दोन व्हाउचर पोलीस दप्तरी दाखल.
तक्रारदार शिवाप्पा कुंभार याचा प्रताप चव्हाट्यावर.
कोल्हापूर :अक्षय पाटील
जाहिरातींच्या माध्यमातून वार्ताहरांना मार्केट मधून पैसे गोळा करण्याच्या उद्योगाला लावून त्यांच्या गळ्याला फास लावण्याची विकृती एका वृत्तपत्र माध्यमात बोकाळली आहे.
शिरोळ मधील दैनिक पुढारीचे तत्कालीन वार्ताहर शरद काळे यांना बनावट शासकीय कागदपत्रे तयार करून अपहाराच्या गुन्हात गोवल्याचे आता उघड झाले आहे.
साप्ताहिक रयत सारथी चे संपादक, सुनिल संकपाळ यांची शेडशाळ गावच्या सरपंच पदी बिनविरोध निवड झालेबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा….
तक्रारदार शिवाप्पा कुंभार यांनी बनावट कागदपत्रे पोलीस तपासात हजर केल्याचा खळबळ जनक प्रकार उघडकीस आल्याने पुढे हे प्रकरण कोणते वळण घेते याकडे आता लक्ष लागले आहे.
शिरोळ मधील दैनिक पुढारीचे तत्कालीन वार्ताहर, पूर्वी दैनिक केसरी साठी काम करीत होते . त्यांना दैनिक पुढारीच्या सेवेत सामावून घेण्याचे आमिष दाखवण्यात आले. पुढे प्रत्यक्षात त्यांना मार्केट मधून जाहिराती, अर्थात पैसे गोळा करण्याची जबाबदारी बेकायदेशीरपणे, जबरदस्तीने सोपवण्यात आली.
वास्तविक, वार्ताहरांचे कामाचे स्वरूप बातमी संदर्भात निगडित असते. परंतु, दैनिक पुढारीकडून त्यांना आर्थिक व्यवहाराशी जोडले जाते आणि भविष्यात काही अडचणी निर्माण झाल्यास त्यालाच बळीचा बकरा करण्याची विकृती या माध्यम समूहाच्या प्रशासनाने चालू ठेवली आहे. शरद काळे यांच्याशी देखिल प्रशासनाने असाच बेकायदेशीरपणे जाहिरात एजंट म्हणून करार केला.
या करारातील अटी पाहता, हा संपूर्ण व्यवहार दिवाणी स्वरूपाचा आहे. परंतू, काळे यांना क्रिमिनल केस मध्ये अडकवून पोलिसांचा ससेमिरा मागे लावला.
दैनिक पुढारी वार्ताहरांना मिळणाऱ्या कमिशनवर देखिल सुरक्षा ठेवीच्या नावाखाली डल्ला मारते. वार्ताहरांना नियमितपणे जाहिरातींचे कमिशन दिले जात नाही. मार्केटमधील थकबाकीचे कारण सांगून कमिशन न देता त्या कमिशन मधून थकित बिले वसूल केली जातात.
निव्वळ पिळवणूक करण्याचा उद्योग प्रशासनाने अनेक वर्षापासून चालवला आहे. काही वार्ताहरांना बळीचा बकरा करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांना देशोधडीला लावण्याचे कुकर्म प्रशासन करीत आहे.
याचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून कुरुंदवाडचे दिवंगत वार्ताहर तानाजी चव्हाण यांचे देता येईल. प्रशासनाच्या कारवाईच्या धक्क्याने तानाजी चव्हाण यांचा अल्पवयात मृत्यू झाला, त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले, देशोधडीला लागले. पण, आपले साम्राज्य बलशाली झाले पाहिजे, या एकाच विचारातून वार्ताहरांच्या गळ्याला फास लावण्याचा प्रकार प्रशासनाने चालूच ठेवला आहे.
प्रशासनाकडून आलेले वाईट अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपुढे मांडल्याने शरद काळे यांचा असाच बळीचा बकरा करण्याचा प्रकार घडला. त्यांच्या विरोधात शिवाप्पा कुंभार यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात खोटी फिर्याद दिली.
वास्तविक, पुढारीकडून शरद काळे यांचे जाहिरात कमिशन येणे आहे. या कमिशनचा हिशोब करावा, असे पत्र दिल्यानंतर त्यांनाच अपहाराच्या गुन्ह्यात अडकवण्यात आले. आता या कटाचा पर्दाफाश करण्याचा निर्धार शरद काळे यांनी केला आहे.
गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलीस यंत्रणा शरद काळे यांच्या मागे लावण्यासाठी कसे प्रयत्न झाले ? कोणी प्रयत्न केले ? याचाही आता लवकरच भांडाफोड करण्यात येणार आहे.
शरद काळे यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाले आहे. या दोषारोप पत्रातील कागदपत्रे पाहता सरकारी दस्तऐवजात (व्हाउचर) बनावटगिरी करून कागदपत्रे जोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन्ही व्हाउचरवर दोन वेगवेगळ्या सह्या आहेत. एकावर पेनाने शरद काळे यांना पैसे दिल्याचे नमूद करण्याचा “प्रताप” शिवप्पा कुंभार याने कोणाच्या सांगण्यावरून केला, याची चौकशी करण्याची मागणी पोलिसात केली आहे.
पुढील भागात : शासकीय कार्यालयातून रोख रक्कम कोणी उचलली ? त्याचे खापर कोणावर ?