
जावेद उर्फ जाहिदहुस्सेन शेख शिवाप्पा कुंभार
शरद काळे यांची लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार; आताही पुढारीपणा वरचढ ठरणार ?
पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वार्ताहरला खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात टाकाण्याची प्रवृत्ती जडली.
कोल्हापूर: अक्षय पाटील
पुढारीचे शिरोळचे तत्कालीन वार्ताहर शरद काळे यांच्या विरोधात अपहाराचा गुन्हा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला. शरद काळे यांना अटक व्हावी, यासाठी त्यांच्या मागे यंत्रणेचा ससेमिरा लावला. यंत्रणेने ज्यांचा शब्द प्रमाण मानून गुन्हा नोंदवला, त्यानाच अडचणीत आणण्याचा प्रताप तक्रारदार अकाउंट मॅनेजर शिवाप्पा कुंभार व जाहिरात मॅनेजर जावेद तथा जाहिदहुस्सेन शेख यांनी केला.
तपास अधिकाऱ्यांना खोटे शासकीय दस्तावेज देणाऱ्यांचा, ते तयार करणाऱ्यांचा शोध घेऊन योग्य कलमान्वये गुन्हा दाखल करावा, असा तक्रार अर्ज शरद काळे यांनी पोलिसांत दिला आहे.

मुळातच शरद काळे यांनी जाहिरात कमिशनचा हिशोब करण्याबाबत पुढारी प्रशासनाला पत्र दिले होते. वास्तविक काळे यांचेच काही लाखांचे कमिशन येणे आहे. वार्ताहरांचा हिशोब करण्याची व्यवहार पद्धतच तक्रारदारांना माहित नाही. देणे घेणे तपासणे, त्याप्रमाणे वार्ताहर व प्रशासन यांनी पूर्तता करणे अपेक्षित आहे.
पण, कोणताही दोन्ही बाजूने हिशोब न करता प्रशासनाने अपहाराची फिर्याद दिली. पण सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं, असे यापूर्वी म्हटल्याप्रमाणे तक्रारदारांचा पाय स्वतः काढलेल्या खड्ड्यात अडकला आणि बनावट शासकीय व्हाउचरचे धक्कादायक प्रकरण चव्हाट्यावर आले.
हाडाची काडं करायची, स्वतःची प्रतिष्ठा खुंटीला टांगायची, बेकायदेशीर जाहिरातींचे पैसे गोळा करायचे, आणि पैशाला चटावलेल्याचे खिसे भरायचे, अकाउंट विभागाकडे स्वतःच्या हक्काच्या कमिशनसाठी भीक मागायची आणि कमिशन मागितले म्हणून बनावट दस्तऐवज तयार करून पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात टाकायचे, अशी प्रवृत्ती प्रशासनाला जडल्याचे शरद काळे यांच्या प्रकरणावरून पुन्हा एकदा उघड झाले आहे.

दैनिक पुढारीचे अकाउंट मॅनेजर शिवाप्पा कुंभार व जावेद शेख यांनी पोलिसांना दिलेल्या दस्तऐवजांमधील बनावटगिरीची चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शरद काळे यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याकडे एका तक्रार अर्जाद्वारे केली आहे.
मुळात शरद काळे यांच्या विरुद्धचा वाद असेल तर तो दिवाणी स्वरूपाचा आहे. असे असताना पोलिसांवर दबाव वाढवून क्रिमिनल स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आता, शरद काळे यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार, पोलीस गंभीरतेने चौकशी करून, शासकीय दस्ताऐवजांमध्ये फेरफार, बनावटगिरी याचा पर्दाफाश करुन बड्या धेंड्यांवर गुन्हा दाखल करणार की, पुन्हा पुढारीपणा वरचढ ठरणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

