शहराबरोबर तालुक्याचे युवा नेते “पृथ्वीराजसिंह यादव” यांच्या आज शनिवारी होणाऱ्या वाढदिवसानिमित्ताने शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड यासह तालुक्याच्या विविध भागांमध्ये “700” हून अधिक “फलक” उभा करून कार्यकर्ते चाहत्यांनी “शुभेच्छां”चा वर्षाव केल्याचे पाहायला मिळत आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात आणि “स्वेच्छेने” उभा झालेले “फलक” पाहता “यादव” यांची तालुक्यात असणारी स्वच्छ “प्रतिमा”, “पारदर्शी” कामकाज आणि त्यांच्या “प्रामाणिकपणा”ला “सलाम” करणारी असल्याचे लक्षात येत आहे.
एका “शिरोळ शहरात “300” हून अधिक फलक लावण्यात आले आहेत. फलक लावताना “घरगडी”, “लाचार” म्हणून ठेवलेल्या ठेकेदारांना “जोर जबरदस्ती”, “शिवीगाळ” , “दमदाटी”, “धमकी” दिली नाही, “ढापलेल्या पैशा”चा वापर करण्यात आला नाही, “फोन नंबर” आणि “यादी” काढून लोकांना, फलक लावायला पाहिजे असा एक “चकार” शब्द सुद्धा काढला नाही. तरीसुद्धा कार्यकर्ते, नागरिकांनी दिलेल्या शुभेच्छा शिरोळ शहराची “मान” उंचावणारी ठरत आहेत.
स्वेच्छेने, प्रेम म्हणून, आपला सच्चा नेता म्हणून नागरिक, कार्यकर्त्यांनी दाखवलेली भावना “श्रद्धा” याची “तुलना” शहरातील कोणत्याही “त्या” व्यक्तीबरोबर होत नसल्याची, वाढदिवसानिमित्त चर्चा सुरू आहे.
शहरात शेकडोंच्या संख्येने लावलेले फलक आगामी निवडणुकीचा, एक प्रकारे आत्ताच निकाल देत असल्याचे लोक बोलत आहेत. नागरिकांमधील चर्चेमुळे अनेकांचा “नाडा” आपोआपच “ढिला” झाला आहे. तसेच चार भिंतीच्या आत केलेल्या जमिन जुमल्याच्या “भानगडी”, मुलाबाळांचे टेन्शन यामुळे “त्याने” सायंकाळी चार वाजल्यापासूनच “मदिरा”-“अमरत्वा”चा सहवासात राहुन “ढोस” वाढवल्याची चर्चा आहे.
पृथ्वीराजसिंह यादव यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून लावण्यात आलेल्या शेकडो फलकांमुळे अनेकांची “पुंगी टाईट” झाल्याची नागरिक, युवक, तरुण, महिला वर्गात चर्चा आहे. डोळ्यात बसत नाहीत इतके असंख्य फलक दिसू लागल्यामुळे अनेक जण त्याचे मोजमाप करण्यासाठी उगाचच शिरोळ जयसिंगपूर असे हेलपाटे मारून स्वतःच्या किंमतीचा व त्याच्या किंमतीचा अंदाज घेत असल्याची चर्चा आहे.