जहरीली “नशा” आणि अवैध व्यवसाय देतात, शिरोळ तालुक्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ ?
बियर बार व्यवसायामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या राज्यातील “वेटर” तरुणांचा बेकायदा व्यवसायाशी घनिष्ठ संबंध ?
जयसिंगपूर शिरोळ आणि कुरुंदवाड मध्ये नशील्या अमली पदार्थांचा धूर आणि अवैध व्यवसायाचे जाळे !
कोल्हापूर : खमक्या वृत्तसेवा
गुन्हेगारी क्षेत्रात वट निर्माण करण्याचे फॅड व्यसनी तरुणांच्या डोक्यात शिरल्यामुळे शस्त्र कायदा व महाराष्ट्र पोलीस कायद्याची तमा न बाळगता तरुणांनी गावठी बनावटीचे पिस्तूल खरेदी करण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान येथे संपर्क वाढवल्याची चर्चा आहे.
शिरोळ तालुक्यात गांजा, अफीम, यासारखी जहरीली नशा, मटका, पत्त्यांच्या पानाचे जुगार अड्डे, ऑनलाइन कसिनो असे अवैध व्यवसाय हद्दीबाहेर गेल्यामुळे गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे कुरुंदवाड आणि शिरोळ प्रकरणानंतर आवर्जून पुढे येत असल्याची चर्चा सुरू आहे.
शिरोळ तालुक्यातील बिअर बार आणि हॉटेल व्यवसायामध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या वेगवेगळ्या राज्यातील तरुणांचा अशा बेकायदा व्यवसायाशी घनिष्ठ संबंध असल्याचे बोलले जात असून वेटरांच्या माध्यमातून गावठी बनावटी पिस्तुलाचे जुगाड लावले जात असल्याची माहिती समजून येत आहे.
काही दिवसांपूर्वी एका बियर बार मधील बिहारी वेटरने गावठी बनावटीचे 15 पिस्तूल आणि 10 तलवारी, कोयता, जंबिया, एडका अशी हत्यारे आणून ठेवल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी “तो” बियर बार, व वेटर भाड्याने राहत असलेली खोली अशी इतर ठिकाणी झाडाझडती घेतल्याची चर्चा आहे. परंतु, हत्यारे मिळून आले नसल्याचे बोलले जात आहे.
पोलिसांना मिळालेल्या खबरमध्ये आजही शंभर टक्के तथ्य आहे, होते. मात्र, घरचा भेदी या वृत्तीला साजेसे असे कृत्य झाल्यामुळे पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याची चर्चा आहे. दरम्यान, संगणमत करून गावठी बनावटीची पिस्तुले आणि इतर हत्यारे गुप्त ठिकाणी शिफ्ट केल्याचे समजते.
“त्या” बियर बार मधील वेटर याने बिहारहून आणलेली घातक हत्यारे “त्या” शहरातील एकाच्या घरी लपवून ठेवल्याची चर्चा असून त्याची एक-एक करून विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने योजना तयार केल्याचे समजून येत आहे.
आजही, “त्या” शहरात घातक हत्याऱ्यांचा साठा करण्यात आल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. अशी हत्यारे कोणी व कोणती दंगल घडवण्यासाठी किंवा दहशत निर्माण करण्यासाठी आणली आहेत ?, याची विक्री कुठे-कुठे केली जाणार आहे ?,
घातक हत्याऱ्याची खरेदी आणि युपी, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान असे कोणाकोणाचे कनेक्शन आहे, याची पाळेमुळे खोदून पोलिसांनी संबधीत गुन्हेगारावर “मकोका” अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी शिरोळ तालुक्यातून केली जात आहे.