“पाच ते सहा” लाखाच्या स्वरूपातील हप्ता, दरमहा “वाड्या”-“वस्त्या”वर पोहचवणाऱ्या ठेकेदाराची कामगारांनी बोलती बंद केली.
4 आणि 5 हजार, तोंडावर फेकून “वाड्या”-“वस्त्या”वरचा “अमरत्वा”चा घास भरवतोय, असा भास निर्माण करणे ठेकेदाराला महागात पडणार ?
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
शिरोळ नगरपरिषदेचे घनकचरा ठेकेदार सर्जेराव पुंदे सर यांनी कामगारांचा तीन महिन्याचा पगार दिला नाही, उलट कामगारांच्या खात्यावर पाठवलेले पैसे सुपरवायझरच्या माध्यमातून काढून घेऊन, स्वतः व संगणमत केलेल्या “त्या” व्यक्तीची तिजोरी भरून कामगारांना भिके कंगाल केल्याची खळबळ जनक माहिती सोमवार दि.14 रोजी समोर आली.
दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनामध्ये अगदी “सेम टू सेम” मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या गंभीर प्रकाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत मुख्याधिकारी व ठेकेदार तसेच सहभागी संगनमत असणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठेकेदार पुंदे सर यांच्या बेकायदेशिर कामकाजाला पाठीशी घालणाऱ्या संगनमतखोरावर फौजदारी गुन्हा दाखल होण्याचे संकेत मिळत आहेत.
कामगारांच्या तोंडातील घास काढून घेऊन, तो “पाच ते सहा” लाखाच्या स्वरूपातील हप्ता, दरमहा “वाड्या”-“वस्त्या”वर पोहचवून माझे कोणी वाकडे करू शकत नाही, असा अविर्भाव सांभळत असल्याची चर्चा असणाऱ्या सरांचा “ओव्हर कॉन्फिडन्स” त्यानेच कमी जास्त पगारावर नेमलेल्या कामगारांनी “मातीमोल” केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पोटावर लाथ मारून, ताटातील अन्नाचा घास हिसकावून घेऊन 4 आणि 5 हजार रुपये तोंडावर फेकून “वाड्या”-“वस्त्या”वरचा “अमरत्वा”चा घास भरवतोय, असा भास निर्माण करून, फसवणूक केल्याचे सांगत, कामगारांनी पुंदे सर यांना, मागील पाच वर्षाचा पीएफ, ईएसआय, थकीत पगार दिल्याशिवाय कामावर येणार नाही असा स्पष्ट इशारा दिला.
काम बंद करण्याबरोबर, थकीत पगार, पीएफ् न देता बाहेरच्या कामगारांकडून काम करून घेण्याचा प्रयत्न केल्यास “जशास तसे, उत्तर देऊ” अशी सूचना कामगारांनी पुंदे सरांना दिली. पुंदे व “वाड्या”-“वस्त्या”वर वास्तव्य करणाऱ्या एका साथीदाराने घनकचरा ठेक्यात कामगारांच्या पोटावर लाथ मारून “साडेचार कोटी”चे “खरकटे” खाऊन टाकल्याचा आरोप करीत यापुढे सगळे पैसे दिल्याशिवाय काम सुरू केले जाणार नसल्याचे कामगारांनी जाहिररित्या सांगितले.