पुंदे सरांचा “फुस” या शब्दातून पृथ्वीराजसिंह यादव यांच्यावर निशाना तर, नाही ना ?
पुंदे सर, “अमरत्व”चा प्याला पाजणार, म्हणजे नेमके काय करणार ?
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
शिरोळ नगरपरिषदेचे घनकचरा ठेकेदार सर्जेराव पुंदे सरांनी बुधवारी संध्याकाळी बेगर वसाहत, शिवाजीनगर परिसरातील तलावाच्या काठावर कामगारांची जमवाजमव करून “सायबी” भाषा वापरल्याची चर्चा आहे. थकीत पगार न देता, उलट कामगारांनाच धमकी देणे किती संयुक्तिक आहे ? असा सवाल करून, पुंदे सरांनी कामगारांशी केलेले वर्तन एका गुंडा सम होते, असे नागरिक सांगताहेत.
सोमवारी थोडे पैसे देतो, कामावर या !, नाहीतर, दुसरे लोक घेऊन काम सुरू करणार आहे. नंतर पगारासाठी कोणतीही विचारणा करू नका जोपर्यंत नगरपरिषद बिल काढणार नाही, तोवर पैसे मिळणार नाहीत, त्यामुळे कामावर यायचं की, नाही ते, ठरवा. असा सज्जड दम ठेकेदार पुंदे सरांनी कामगारांना दिल्याचे समजते.
पुंदे सरांची वरचढ भाषा लक्षात घेऊन नरमलेल्या गरीब, मागासवर्गीय कामगारांनी ठीक आहे, कोणाला काम करायच आहे, ते करू देत. थकीत पगार, पीएफ, ईएसआय न देता दुसऱ्याकडून काम करून घेणं योग्य आहे का ? असे कामगारांनी नम्रपणे बोलून पुंदे सरांना नमस्कार केला. पण, पुंदे सरांनी बघा बघाच, मी काय करतोय ते, दाखवतोच अशी उलट धमकी दिल्याची कामगारांच्या चर्चा आहे.
घनकचरा ठेक्याची खरी माहिती कोणी ?, कोणाला दिली ?, “वाड्या”-“वस्त्या”वर किती कोटी दिले ? हे कोणी कोणी सांगितले आहे ? याची माहिती समजली आहे. योग्य वेळ आल्यानंतर हिसकाच दाखवतो, “फुस” लावणाऱ्यांच्या नादाला लागून काहीतरी करायचा प्रयत्न करशीला पण, गाठ “वाड्या”-“वस्त्या”वरच्याशी आहे, एवढे लक्षात ठेवा. असा दम पुंदे सरांनी कामगारांना देवून, कामावर या सोमवारी “अमरत्व” मिळवून देतो असे आश्वासन दिल्याची नगरपरिषद वर्तुळात चर्चा असल्याचे समजते.