प्रकरण अंगाशी येणार, एका विद्वान कायदे पंडिताचा, बनावट कागद प्रतिज्ञापत्राद्वारे मागे घेण्याचा सल्ला.
चार्जशीटमधून दस्तऐवज कसा गायब केला जाणार, बळीचा बकरा कोणाला करणार याकडे सर्वांचे लक्ष !
कोल्हापूर : अक्षय पाटील
पुढारीचे तत्कालीन वार्ताहर शरद काळे यांना अडचणीत आणण्यासाठी तक्रारदार शिवाप्पा कुंभार यांनी तपासाच्या अनुषंगाने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात सादर केलेल्या दस्तऐवजामध्ये बनावट शासकीय व्हाउचर जोडल्याचे चार्जशीट मधील कागदपत्रावरून स्पष्ट झाले आहे. आता हे प्रकरण अंगाशी येणार असल्याने त्यांच्याच गोटातील एका विद्वान कायदे पंडिताने सदर बनावट कागद प्रतिज्ञापत्राद्वारे मागे घेण्याचा सल्ला दिला आहे. आता हा कागद चार्जशीटमधून गायब होतो काय, याकडे लक्ष लागले आहे
चार्जशीट मध्ये एकदा सादर केलेला कागद पुन्हा बाहेर काढणे किंवा गायब करणे म्हणजे, नव्याने दुसरा गुन्हा करणे, असाच प्रकार आहे. न्याय व्यवस्था इतकी सोपी आहे का? न्यायव्यवस्थेचे चक्रव्यूह भेदने इतके सहज आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच न्यायालयीन परीसीमा ओलांडून, बनावट दस्तऐवजाच्या माध्यमातून तक्रारदार शिवाप्पा कुंभार यांचा अडकलेला पाय विद्वान कायदे पंडित कसा बाहेर काढणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दरम्यान, शरद काळे यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यानंतर मुंबई पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र कोल्हापूर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडे संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी तक्रार दिली आहे. तसेच सुप्रीम कोर्ट दिल्ली आणि हायकोर्ट मुंबई यांना ई-मेल द्वारे माहितीसाठी तक्रार पाठवली आहे.
तक्रारदार शिवाप्पा कुंभार याने तक्रारीत सादर केलेल्या बनावट दस्तऐवजामुळे प्रशासनाचे कुभांड सर्व वार्ताहरांच्या लक्षात आले आहे. त्यातच, विद्वान कायदे पंडिताने बनावट दस्तऐवजामुळे चव्हाट्यावर आलेले प्रकरण रफादफा करून अब्रू वाचवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. परंतु, हा दुसरा महामूर्खपणा ठरणार आहे.
अंगाशी आलेली प्रकरणे बाहेरच्या बाहेर तडजोड करून मिटवण्याची सवय लागलेल्या विद्वान कायदे पंडिताने बनावट दस्तऐवज गायब करण्याच्या दृष्टीने कागदोपत्री हलचाली करण्याबरोबर कुंभार याच्या कंपूतल्या कुणालातरी एकाला बळीचा बकरा करण्याचे षडयंत्र आखले आहे.
मुळात शरद काळे यांनी रोख रक्कम व धनादेश स्वीकारला नाही असा स्पष्ट उल्लेख तहसीलदारांनी आपल्या पत्रात केला आहे. तरी सुद्धा सदरच्या रकमेचा काळे यांनी अपहार केल्याचा आरोप गुन्ह्यात नोंदवून त्या संदर्भातील दस्तऐवज चार्जशीटमध्ये जोडले आहेत. बनावट दस्तऐवजावर, हस्ताक्षरात सदरची रक्कम शरद काळे यांना दिल्याचे लिहिले आहे. तर मूळ पावतीवर सागर कोळी यांची सही व मोबाईल नंबर आहे.