कारभाऱ्यांचे, पाच वर्षात खायचे दात जनतेला दिसलेच नाहीत, पण, अंकुशने संपुर्ण बच्याळीच दाखवली.
कारभारी मुळ्यातली, भ्रष्टाचारी “मादीमुळी” कोणती ? याचा अंकुशने नाव घेवून उलघडा केला.
19 लाखाचा “निधी” कोणाकडे जमा झाला. याचाही उलगडा करण्यासाठी नगरसेवकांनी पुढे येण्याची मागणी.
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
आंदोलन अंकुशचे संस्थापक अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी शिरोळ नगरपरिषदेमध्ये सन 2018 ते 2023 यादरम्यान, एकहाती सत्ता असलेल्या कारभाऱ्यांनी जनतेचा विश्वासघात करून कसा, कोट्यावधीचा ढपला पाडला ?. हे पत्रकार बैठकीत नावासहित सांगितले.
अंकुशने पाच वर्षाच्या सत्तेच्या काळात कारभाऱ्यांनी केलेल्या गैर कारभारावरून, थेट भ्रष्टाचारी मनोवृत्तीच्या गळपटीला हात घालून नागरी हित जोपासल्याची चर्चा शिरोळ शहरात बरोबर तालुक्यात रंगली आहे.काही दिवसापूर्वी नवीन नळ कनेक्शन मधील भ्रष्टाचार प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना गजाआड केल्याची घटना ताजी आहे.
आता 5 टक्के जादा दराने निविदा काढून 6 कोटीचा ढपला पाडल्याचे दाखवून देऊन, पाच वर्षाच्या सत्तेतील कारभाऱ्यांचे स्पष्ट नाव घेऊन बुरखा पाडून टाकल्याचे लोक बोलत आहेत.पाच टक्के जादा दराने निविदा काढून जनतेची सहा कोटी रुपयांची फसवणूक केली ?, जादा दराने निविदा काढली खरी पण, जादाचे काम कुठे कुठे केले ?,
शासनाचा जादाचा पाच टक्के निधी कुठे गेला ? यामध्ये कोणा कोणाचा सहभाग आहे ? याची चौकशी, पाठपुरावा करण्याबरोबर जबाबदारी निश्चित करून प्रशासन तसेच शासनाला फौजदारी गुन्हे दाखल करण्यास भाग पाडून त्यांची तुरुंगात रवानगी करे पर्यंत अंकुश व धनाजी चुडमुंगे मागे हटणार नाहीत असा विश्वास शिरोळ शहरातून व्यक्त होताना दिसत आहे.
आंदोलन अंकुशचे चुडमुंगे यांनी थेट नावाचा उल्लेख करून भ्रष्टाचाराचा बॉम्ब फोडल्यामुळे शहरातील नागरिकांना कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचारातील नेमका “नारद” कोण आहेत ? हे आता सांगण्याची गरज उरली नाही. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर प्रत्येक नगरसेवकांचा 19 लाख रुपये प्रमाणे, वाट्याला आलेला “निधी” कोणाकडे जमा झाला. याचाही उलगडा करण्यासाठी नगरसेवकांनी पुढे यावे अशी मागणी शहरातून होत आहे.
या भल्या मोठ्या भ्रष्टाचारी वृक्षाच्या बुंद्याखालील पृष्ठभागावर नजर टाकली तर, कारभारी मुळ्यातली, भ्रष्टाचारी “मादीमुळी” कोणती हे लगेचच लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. पाच वर्षाच्या कामाचे फलित म्हणून “अमरत्व” मिळेल, असा आशावाद ठेवलेल्या मुळ्याना “विषारी” प्याला मिळाला. त्यामुळे त्यांची अवस्था “खाया-पिया कुछ नही, ग्लास तोडा बारा आना का” अशी झाली आहे.
पुढील बातमी : “खाया-पिया करोड का, और ग्लास तोडा बीस के रोखड का”