
गुगलवरील संग्रहित छायाचित्र
ठेकदार पुंदे बचावासाठी शासन व पोलीस प्रशासनाकडे तक्रार करणार?
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
सलग पाच वर्षे शिरोळ नगरपरिषद कडील घनकचऱ्याचा ठेका मिळवण्यासाठी नगर परिषदेमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कनिष्ठांपर्यंत “अमरत्व”ची टक्केवारी दिली आहे. घनकचरा ठेक्यात एकट्याने ढपला पाडला नसून त्यात “32 हजार” “बुडव्या” सहभागी आहे त्यामुळे एकट्याचाच बळी दिला जाऊ नये, असे याचना करणारे निवेदन, पत्र, तक्रार अर्ज सह्याद्री ऍग्रो सायन्सेसचे सर्जेराव पुंदे सर, मुख्यमंत्री ते मुख्याधिकारी यांच्यापर्यंत करणार काय ? अशी सवालात्मक चर्चा शिरोळ शहरात रंगली आहे.
शिरोळ नगरपरिषदेने बेकायदेशीर कामकाजाला पाठबळ देत कशा पद्धतीने सह्याद्री ऍग्रोला ठेका दिला ?, कामगारांची बोगस संख्या दाखवून कशी शासनाच्या पैशाची लूट केली ? कामगारांचा पीएफ कसा गिळंकृत केला ? किमान वेतन कायदा कसा धाब्यावर बसवला ? कामगारांना कशा पद्धतीने कमी जादा पगार दिला ? याचा कागदोपत्री पुरावा दाखवत युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी नगरपरिषद कामकाज आणि घनकचरा ठेकेदार यांची पळता भुई करून ठेवल्याचे प्रकरण गेले अनेक दिवस शिरोळ मध्ये चर्चेत आहे.

घनकचरा ठेका प्रकरणात शासनाच्या पैशाची बेसुमार लूट करून देखील उजळ माथ्याने फिरणाऱ्या ठेकेदाराला फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असा दिलेला फाजील आत्मविश्वास लवकरच हवेत विरून जाईल अशी चर्चा असल्याचे समजते.
फौजदारी गुन्हा दाखल होण्यापूर्वी ठेकेदार पुंदे सरांनी, सरकार तसेच पोलीस प्रशासनातील विविध विभागाला तक्रार अर्ज देऊन, कोणाला किती टक्केवारी दिली ? “अमरत्व”च्या नावाखाली “32 हजार बुडव्या”ला किती कामगारांचा पगार उचलून दिला ? “32 हजार बुडव्या”च्या घरात ठेक्याकडील कामगार शेणघाण, स्वयंपाक, धुनी भांडी करण्यासाठी दिले ? याची अर्जात मांडणी केली तरच गळ्याचा फास आवळणार नाही अशी चर्चा शहरात रंगली आहे.
घनकचरा ठेक्याच्या माध्यमातून सलग पाच वर्षे शासनाकडून मिळालेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधी मधून सुमारे साडेचार कोटी रुपयांची चोरी करण्यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची नावे व्यक्तींची नावे तक्रार अर्जात घेत असताना, पुंदे सर, माझे व माझ्या कुटुंबाचे मानसिक खच्चीकरण झाले आहे, मला व माझ्या कुटुंबा बाबतीत एखादा अनुचित प्रकार घडला तर त्याला “32 हजार बुडव्या”सह वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठांपर्यंतचे कर्मचारी जबाबदार असतील असे म्हणणार काय ? असे शहरात तर्क वितर्क लढवले जात असल्याचे समजते.

