बनावट दस्तऐवज करून खोटा गुन्हा दाखल करण्याच्या कटात सहभागी असणाऱ्या प्रमुखांचा फोटो सहित पर्दापाश होणार !
बनावट व्हाउचर करणारे आणि कायदा धाब्यावर बसून, रोखीने पैसे अदा करून तसे व्हाउचर देणारे रडारवर ?
बनावट व्हाउचर प्रकरण, पुराव्यासह जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दाखल,फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शरद काळे यांची मागणी.
कोल्हापूर : अक्षय पाटील
खोट्या गुन्ह्यात गोवण्यासाठी, सादर करण्यात आलेले, शिरोळ तहसील कार्यालयाचे बनावट पावती, व्हाऊचर तयार करणाऱ्या विरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना द्यावेत.
महाराष्ट्र शासनाच्या सन 2016 च्या प्रचलित धोरण आणि कायद्यानुसार कॅश मॅनेजमेंट प्रोग्रॅम अंतर्गत कोणतीही रक्कम रोखीने अदा करण्याची परवानगी नसताना, संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून ,विना सिरीयल नंबर,त्यावर एक रुपयाचे स्टॅम्प तिकीट लावून तसा दस्तऐवज तयार करून त्यावर रोखीने पैसे अदा केल्याचे पावती, व्हाउचर शिरोळ तहसील कार्यालयाने तयार केले आहे.
राज्य शासनाच्या प्रचलित धोरणाला आव्हान देत, बेकायदेशीर रित्या रोखीने पैसे अदा करुन त्याची पावती, व्हाउचर देणाऱ्या शिरोळ तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून कारवाई करावी. अशी मागणी शरद काळे यांनी लोकशाही दिनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
हिच मागणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजित पवारजी व महसूल कमिशनर यांना पाठवण्याबरोबर दिल्ली सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई साहेब व मुंबई उच्च न्यायालयाचे चीफ जस्टीस यांना मेलद्वारे देण्यात आल्या असून, असे बेकायदेशीर कामकाज करणाऱ्यां वर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आदेश करावेत असे म्हटले आहे.
दैनिक पुढारीचे तत्कालीन वार्ताहर शरद काळे यांच्या विरुद्ध अकाउंट मॅनेजर शिवाप्पा कुंभार यांनी दिलेल्या अपहाराच्या फिर्यादीमध्ये शिरोळ तहसील कार्यालयाचे बनावट व्हाउचर तयार करून त्यावर खोटी सही करून त्याखाली सागर कोळी यांनी स्वअक्षरात सदरचे बिल शरद काळे यांना दिले असल्याचे बेकायदेशीर रित्या मनमानी पद्धतीने नमूद केले आहे.
बनावट दस्त ऐवजप्रकरणी शरद काळे यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता साहेब आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे यांच्याकडे संबंधितांवर फौजदारे गुन्हा दाखल करण्याची मागणी करून, न्यायालयात धाव घेतली आहे.
दरम्यान, खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बनावट दस्तऐवजाचे प्रकरण बाहेर पडले. आता आपले भिंग फुटणार, बदनामी होणार, फोटो प्रसिद्ध होणार या भीतीने फिर्यादी शिवाप्पा कुंभार आणि त्याच्या अन्य साथीदारांनी शिरोळ, जयसिंगपूर आणि नृसिंहवाडी येथील तिघांना हाताशी धरून शरद काळे यांच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्याचा केलेला प्लॅन केला.
पण, शरद काळे यांनी हा प्लॅन उधळून लावत, खोट्या गुन्ह्या संदर्भातील नावासहित माहिती जिल्हा व स्थानिक पोलीस प्रशासन, राज्य शासन व गृह विभाग तसेच दिल्ली व मुंबई न्यायालयाच्या न्यायाधीशांना कळवली आहे. आता बनावट दस्तऐवज तयार करणे, शासनाचा कायदा धाब्यावर बसवत रोखीने पैसे अदा करणे, बेकायदा व्हाउचर तयार करणे या प्रकरणी जिल्हा पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी व शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.