संस्थेचे नामोनिशान नाही, कोट्यावधी रुपयांचे कर्ज, परतफेड नाही, तरीही “त्या” बँकेने जमिनी विक्रीसाठी ना हरकत दाखला दिला ?
जांभळीतील “त्या” संस्थेचे अस्तित्व दाखवा अन् कोट्यावधी मिळवा, आणि सोसायटीच्या जागेत, ऑफिस दाखवा अन् लाखो मिळवा.
जांभळी : खमक्या वृत्तसेवा
शिरोळ तालुक्यातील जांभळी आणि जयसिंगपूर लगत असणारी एक हाउसिंग सोसायटी अशा दोन संस्थेमधील कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे भिंग लवकरच फुटणार अशी चर्चा आहे. या दोन्ही संस्थांच्या अध्यक्षांचे एकमेकांशी घट्ट नाते असून “ताटात सांडले काय ? अन् वाटीत सांडले काय ?” असा जिव्हाळा असल्याचे “त्या” सहकारी संस्था मधील वर्तुळातून समजते.
खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या साडेतीन महिन्याच्या पिकातून निर्माण होणाऱ्या “बिया” पासून “माळकरी मटन” या सारखी वेगवेगळी उत्पादने तयार करणे, आणि शेतकऱ्यांचा उत्कर्ष करणे असा उदात्त हेतू ठेवून निर्माण केलेल्या “त्या” संस्थेतील कारभारी मंडळींनी ठेवीदार ,सभासदांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याचे समजते. तसेच संस्थेच्या अध्यक्षांनी संस्था व सभासदांची परस्पर विल्हेवाट लावून मुंबई व दिल्ली शासनाची दिवसाढवळ्या फसवणूक सुरू ठेवली असल्याचे बोलले जात आहे.
सध्या, या संस्थेची स्वमालकीची किंवा भाड्याची इमारत नाही, जागा-जमीन नाही, उत्पादन करणाऱ्या मशिनरी नाहीत, कोणतेही उत्पादन केले जात नाही. तरीही, ही संस्था कागदोपत्री सुरू आहे. संस्थेला प्रत्येक वर्षी आठ ते दहा हजार रुपयांचा फायदा होत आहे आणि संस्थेची प्रत्येक वर्षी, वार्षिक सर्वसाधारण सभा शिरोळ येथे एका कारखान्यात सुरळीतपणे पार पडत असल्याचे कागदपत्रातून दिसून येत असल्याची चर्चा आहे.
आज घडीला, ही संस्था कागदोपत्री सुरू असल्यामुळे “महादेवा”चा आशीर्वाद घेऊन, सभासदांचा “विश्वास”घात करणार नाही, अशी शपथ घ्यायची. आद्य दैवत “गणपती” देवाची व “श्री दत्त” महाराजांची आराधना करायची आणि पुन्हा या संस्थेचे “विस्तारीकरण” करण्याची खोटी कागदपत्रे करून खाजगी किंवा शासकीय बँकेचे कोट्यावधी रुपये कर्ज काढून ते गिळंकृत करण्याचा डाव केला जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
हाउसिंग सोसायटीचा सर्वेसर्वा आहे अशी फडफड करून, “राजेश” नावाच्या तंबाखूचा चुटका ओठाखाली लपवणाऱ्या महाभागाने आपल्याच घरात संस्थेचे ऑफिस सुरू ठेवले असताना ते ऑफिस सोसायटीच्या जागेत आहे असे कागदपत्री दाखवून त्यावरती 25 लाखापेक्षा अधिक खर्च दाखवून ती रक्कम हडप करून सभासदांना कात्रजचा घाट दाखवल्याचे समजते.
सध्या, या महाभागाने दत्त मध्ये प्रामाणिकपणे नोकरी करून मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना स्व स्वार्थासाठी काळ्यापाण्याची शिक्षा सुरू केल्याचे बोलले जात आहे. नाहक त्रासामुळे कुटुंबाच्या होणाऱ्या पिळवणुकीचा, या महाभागाला एक दिवस “कोप” लागेल असेही नागरिक बोलत असल्याचे समजते. पैशाने कागदोपत्री जुळवा जुळव करणे सोपे आहे. पण, न्यायदेवतेने गालावर मारलेले थप्पड लपवणे अवघड आहे.
पुढील भागात : दोन्ही अध्यक्षांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे.