खुर्ची मिळवण्यासाठी इतका आटापिटा का ?, खा. छ. शाहू महाराजांच्या कार्यपद्धतीचे अनुकरण का नाही ?
खा.छ. शाहू महाराज यांचे योगदान आणि तेच प्रणेते आहेत. परंतु, महाराज, मी करून आणले असे म्हणत नाहीत, व मीपणाही दाखवत नाहीत.
कोल्हापूर : विशेष वृत्त
कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच होण्याचे खरे श्रेय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनाच जाते. तर त्यासाठी खासदार शाहू महाराज यांनी ताकद लावून पाठपुरावा केला, ही बाब लपून राहिलेली नाही; पण शाहू महाराजांनी कधी मीपणा दाखवला नाही. असे असले तरी शाहू महाराज हेच सर्किट बेंचचे प्रणेते आहेत, अशी प्रामाणिक कबुली कोल्हापुरातील काही वकिलांनी दिली.
सर्किट बेंचचे उद्घाटन दि.17 ऑगस्ट रोजी होणार आहे. तत्पूर्वीच काहींनी आपणच सर्किट बेंचचे प्रणेते, असा गाजावाजा करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे स्वतःला व्यासपीठावर खुर्ची असावी, यासाठी सुद्धा जोरदार प्रयत्न आणि हालचाली सुरू केल्या आहेत.
सर्किट बेंचचे स्वतः प्रणते आहोत असे सांगणाऱ्यांना 25 वर्षात कोल्हापूरला सर्किट बेंच आणता आले नाही. हे अपयश कोणाचे, असा सवाल काहींनी उपस्थित केला. मात्र, खासदार शाहू महाराज यांनी कोणताही गाजावाजा न करता, प्रत्यक्ष पडद्यावर न येता, विकासाचा दृष्टिकोन ठेवून ,श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत सर्किट बेंच आणून लौकिकात भर टाकली. परंतु, याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही. शाहू महाराजांची ही कार्यपद्धती हृदयाला भिडणारी आहे.
सरन्यायाधीश गवई साहेब यांचे श्रेय आणि खासदार शाहू महाराज यांचे योगदान याची माहिती कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यातील बार असोसिएशन तसेच शेतकरी, पक्षकार, नागरिकांपासून लपून राहिली नाही. त्यामुळे कोणीही आपण सर्किट बेंचचे प्रणेते आहोत, असे सांगणे म्हणजे न्यायदेवते बरोबर दोन वरिष्ठांचा अवमान करण्यासारखे आहे.
सर्किट बेंचच्या उद्घाटन सोहळा समारंभाचे औचित्य साधून सर्व श्रेय, योगदान आपल्या ताटात ओढून घेण्यासाठी सुरू केलेला आटापिटा हा न्यायालयाच्या माध्यमातून पक्षकार व इतरांवर दबाव वाढवण्यासाठी सुरू आहे. आणि ही बाब भारतीय राज्यघटनेची पायमल्ली करणारी आहे. याचा विचार होण्याची आवश्यकता आहे.
सर्किट बेंच होण्याचे खरे श्रेय सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आहे तर त्याचे प्रणेते खासदार शाहू महाराज आहेत. त्यांचे योगदान, श्रेय पुसून टाकून ते स्वतःकडे घेण्याचा, काहींनी चालू केलेला प्रयत्न हा स्वार्थीपणाचा कळस आहे.
चौकट
स्वतःला प्रणेते म्हणवणाऱ्यांचे चेले आहेत. साहेबांचा सत्कार करायला पाहिजे, अशी सुचना बैठकामध्ये करायला सुरुवात केली आहे.त्यातून प्रणेते म्हणून मिरवण्याचा प्रकार दिसून येत आहे. अशा पडद्यामागील हालचालींनी साहेबांचे अधिकच हश्य होत आहे.