ज्यांच्यामुळे, न्यायालयाबद्धल गैरविश्वास निर्माण होईल, अशांना व्यासपीठापासून दूर ठेवावे.
कोल्हापूर : खमक्या वृत्तसेवा
सर्किट बेंच उद्घाटनाचा क्षण सर्वांना अनुभवता आला पाहिजे, त्याचे सार्वजनिक ठिकाणी समारंभाचे आयोजन करावे अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केली होती. सर्वांना सहभागी होता यावे.हा समारंभ सर्वांसाठी खुला आहे.विविध क्षेत्रातील निमंत्रितासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली जाईल.अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नुकतीच दिली आहे.
ज्यांनी व्यासपीठावर प्रमुख मान्यवरांशेजारी “स्थान” मिळावे याकरिता मागील आठ दिवसा पासून खटाटोप, आटापिटा सुरू ठेवला होता. त्यांच्या “श्रेयकार” या महत्वकांक्षावर पाणी फिरले आहे. निमंत्रितांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था या अधोरेखित शब्दामुळे व्यासपीठावरील “खुर्ची” आणि “स्थान” मिळवण्यासाठी “गुडघ्याला बाशिंग” बांधलेल्यांना हा सोहळा भंगलेले स्वप्न ठरणार आहे.
कोल्हापूर येथे सर्किट बँक होण्याचे खरे श्रेय कोणाचे आहे ? कोण प्रणेते आहेत ? नाहक कोण आटापिटा करीत आहे ? या सर्व बाबी शासनाच्या नजरेत येण्यासाठी फारसा उशीर लागला नाही. तब्बल 42 वर्षाच्या संघर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या ज्या मध्यमांनी योगदान दिले आहे. ते सर्व सोहळ्यासाठी निमंत्रित आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत व्यासपीठावरील व्यक्तींच्या संख्येबाबत अधिका-यांना सूचना केल्या आहेत.सर्किट बेंच उद्घाटन हा समारंभ पूर्णतः शासकीय, न्यायालयीन आहे. त्यामुळे असंबंधित आणि न्यायालयात दावे प्रलंबित असणाऱ्या व्यक्तींना व्यासपीठावर स्थान दिल्यास समाजात चुकीचा संदेश जाणार आहे. त्यामुळे आपणास न्याय मिळणार की नाही, अशी शंका निर्माण होणार आहे. पुढे जावून न्यायव्यवस्थे बद्दल गैरविश्वासाचे वातावरण निर्माण होऊ शकते.
त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यासपीठावरील व्यक्ती निश्चित करताना न्यायालयाबद्दल ज्यांच्यामुळे गैरविश्वास निर्माण होऊ शकतो अशा व्यक्तींना व्यासपीठापासून दूर ठेवावे अशी लोकभावना आहे. या भावनेचा आदर व्हावा, अशी मागणी कोल्हापूर सह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांची आहे.