संत्या, शंकर्या, ज्याव्याने केली भांडाफोड, परदरचे घालून मंडळांची भर का करायची ?
जयसिंगपूर : खमक्या वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्ह्यात खंडपीठ, पाऊस आणि दहीहंडी या तीन विषयावर शहरात गल्ली बोळात, प्रभागा-प्रभागात, चौका-चौकात जोरदार चर्चा होती. सरन्यायाधीश भूषण गवई यांना मनापासून धन्यवाद देत खंडपीठाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. आता दहीहंडी हा एकच विषय खमंगपणे चर्चिला जात आहे, चालू वर्षी कोणा कोणाची दहीहंडी होणार ? किती बक्षीस असणार ? यावर युवक तरुण वर्गातून आत्मविश्वास नोंदवला जात आहे.
विशेष म्हणजे, ज्यांनी गावाला लुटून कोट्यावधी रुपये जमा केले, अशांनी चालू वर्षी दहीहंडीतून माघार घेतली, रेष ओढल्यामुळे तरुण वर्गात कुचिष्ठेचा फड रंगला आहे. अभद्र आणि असंविधानिक तसेच अनैतिक भाषेत खरपट्टी सुरू आहे. चर्चेतून त्याच्या अब्रूचे धिंडवडे काढले जात आहेत. दरम्यान, रविवारी रात्री एका चौकात संत्या , शंकर्या आणि ज्याव्या या तीन मित्रांची दहीहंडी विषयावर चांगलीच चर्चा रंगली होती.
संत्या : उद्याच्या 20 तारखेला दहीहंडीचे मोठे नियोजन केलय, लाखाच बक्षीस लावलय, मोठा कार्यक्रम घेतलाय, आता ती सोडत नाहीत ह्यला, निवडणुकीत सुद्धा लोळवत्यात.
शंकर्या : त्यांच्या मागे लई मोठी “खमक्या” यंत्रणा हाय, आता ती त्याला घरातच बसवत्यात असच दिसतय बाबा, संत्या, तू बोलतोस ते मला पटतय आणि खरं पण, हाय बघ.
ज्याव्या : अरे मग, यावर्षी एकच मोठी दहीहंडी होणारा वाटतं, 32 हजार बुडव्याची दहीहंडी नाही ? काय त्यांन माघार घेतली, रेष ओढली वाटतं.
शंकर्या : तुला माहित नाही, काय झालय ते ? बुडव्या दहीहंडीसाठी पैसे मागायला जयसिंगपुरला आलता, मी तिथच होतो, दोन्ही साहेबांनी सांगितलं, तू गावाला लूटून गोळा केलल पैसे कुठहाईत, त्यातलेच पैसे खर्च कर, आम्ही पैसे देणार नाही अस सांगितलय.
संत्या : तरीच म्हटलं, ह्यो मागं मागं का सरायला लागलाय ? ह्यला पदरचे पैसे घालायला लागत्यात आणि पोरं पण कोण, याच्या बाजूला उभा रहायला तयार नाहीत, हिची सगळी गुण गावाला समजल्यात. आता काय करतोय.
ज्याव्या : परवा 15 ऑगष्टला बॅकेजवळ तीनशे जणांचा नाष्टा आणला होता, त्यातला दिडशे सुद्धा नाष्टा खपला नाही, यावरणच ओळखायचं रे , त्याची किंमत राहील्या काय.
शंकर्या : बुडव्याने चार-पाच वर्षात अख्या गावाचं वरबडून खाल्लयं, पैसे नाहीत कस म्हणतोय, जमीन घेतल्या, पन्हाळ्यात जागा घेतल्या असल्या तरी एवढं पैसे संपत नाहीत. दहीहंडीला दहा हजाराचं बक्षीस लावण्याची सुद्धा तिची लायकी राहिली नाही काय ?
संत्या : अरे त्याला मंडळांना पैसे द्यायचे नाहीत, त्यांना निवडणुकीत फुकट राबवून घ्यायचं आहे. आता मोठं बक्षीस लावलं तर, लोक म्हणणार ढापलेला पैसा बाहेर काढलाय म्हणून त्यानं आयडिया केल्या.
ज्याव्या : गावातल्या पोरांसनी एवढं पण, कळत नाही. बुडव्या, दोन-चार मटणाच्या फोडी टाकतोय, ही खात्यात आणि त्याची शेपूट धरून, ही माग माग फिरत्यात, कशाला पाहिजे रे , ह्यला आता पोरांनी घरातच बसवायला पाहिजे. नाहीतर ह्यो गावाला बुडवणार.
शंकर्या : खरं सांगू काय , आता बुडव्याच गुळगुळीत झालेलं नाणं चालत नाही. सगळ्या पोरांच्या मनातनं उतरलाय, सगळ्यांना सगळं समजलय, आपण आपलं बघुया, कुणाला तरी गंडा घालण्याची आयडिया सांगा. या बुडव्याच्या नादाला लागून हाय ते पण, विकायला लागेल, चला उशीर होतोय, असे बोलून तीघांनी बैठक गुंडाळली.