दि. 14 रोजी कार्यालयासमोर ध्वजारोहण केले नाही ? देशाप्रती भक्ती भावना नसल्याचे उघड
देशाप्रती भक्ती भावना जागृत करणे आणि ध्वजाशी भावनिक नाते निर्माण करण्याच्या उपक्रम केला नजरेआड.
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
शासनाने दि.13 ते 15 ऑगस्ट दरम्यान सलग तीन दिवस ध्वजारोहण करण्याच्या काढलेल्या परिपत्रकाला शिरोळ भूमी अभिलेख कार्यालयाने कचऱ्याची टोपली दाखवत दि.14 रोजी धजारोहन केले नसल्याची खळबळ जनक माहिती पुढे आली आहे. प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे, तिरंगा ध्वजाशी भावनिक नाते निर्माण करणे या उद्देशाशी कोणताच संबंध नसल्याचे शिरोळ कार्यालयाने दाखवून दिल्याची चर्चा सुरू आहे.
शासनाने परिपत्रक काढून शाळा, शासकीय कार्यालय तसेच प्रत्येक घरावर ,”हर घर तिरंगा” उपक्रमांतर्गत सलग तीन दिवस ध्वजारोहण करून देशाप्रती भक्तीची भावना जागृत करण्याचे आवाहन केले होते. पण या भक्तीला आणि परिपत्रकाला शिरोळ भूमी अभिलेख कार्यालयाने हरताळ फसला असून, या कृतीतून देशाप्रती भक्ती भावना नसल्याचे आणि शासन परिपत्रकाचा आदर नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी संबंधितावर कडक कारवाई करावी अशी मागणी पक्षकार, नागरिक, शेतकरी तसेच देशभक्तातून होत आहे.
शासनाने “हर घर तिरंगा” उपक्रमांतर्गत काढलेले परिपत्रक शासनाच्या भूमी अभिलेख कार्यालयास बंधनकारक आहे, या परिपत्रकानुसार सर्व शासकीय कार्यालय, स्वायत्त संस्था, शाळा, कॉलेज यांनी सलग तीन दिवस ध्वजारोहण केले आहे. परंतु शिरोळ भूमी अभिलेख कार्यालयाने दिनांक 14 रोजी ध्वजारोहन करण्यास फाटा देऊन एक प्रकारे अवामान करण्याचे कृत्य केले असल्याचा आरोप होत आहे.
एरवी शेतकरी, पक्षकार, नागरिकांना, डारडूर, अरेरावी करणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयाच्या या कृतीबद्दल जिल्हाधिकारी यांनी कडक शासन करण्याची गरज आहे, कार्यालय आणि त्या ठिकाणचे कर्मचारी देशाप्रती भक्ती भावना जागृत करू शकत नाहीत, परिपत्रकाचा आदर करू शकत नाहीत,ते कार्यालय शेतकरी, पक्षकारांचा आदर करत असेल काय ? याचा सारासार विचार करून निरडावलेल्या शिरोळ भूमी अभिलेख कार्यालयावर भारतीय ध्वज संहिता 2002 आणि राष्ट्रीय सन्मान, अपमान प्रतिबंधक कायदा 1971 प्रमाणे कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.