“शिवप्रतिष्ठान”चे संभाजी भिडे गुरुजी यांची “स्पंदन” हॉस्पिटलला सदिच्छा भेट.
“स्पंदन”ची निर्मिती फक्त रुग्ण “सेवा” करण्यासाठी ; डॉ. विशाल चौगुले
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
हिंदुस्तान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष “संभाजी भिडे” गुरुजी यांनी मंगळवारी शिरोळ येथील “स्पंदन सुपर स्पेशलिटी” हॉस्पिटलला भेट देऊन श्री गणेशाची आरती केली आणि हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या पद्धतीचे कोणकोणत्या रोगावर उपचार केले जातात याची माहिती घेतली.
हॉस्पिटलचे संचालक डॉ. विशाल चौगुले यांनी हॉस्पिटलमध्ये कोण कोणत्या आजारावर उपचार केले जातात. तसेच नव्याने सुरू केलेल्या “कॅन्सर” विभागाची विस्तृत पद्धतीने भिडे गुरुजींना माहिती दिली. स्पंदन हॉस्पिटलची निर्मिती “पैसे” मिळवण्यासाठी नाही तर रुग्ण “सेवा” करण्यासाठी आहे, हॉस्पिटलकडून प्रत्येक रुग्णाला तुलनेत कमीत कमी पैशांमध्ये उपचार केले जातात.
ज्या रुग्णांना उपचाराकरिता सांगली, मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर या ठिकाणी जावे लागत होते. त्या सर्व रूग्नांच्या रोगावर स्पंदन हॉस्पिटलमध्ये उपचार होतात. हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक मशिनरीच्या माध्यमातून रुग्णावर उपचार केले जातात. त्यामुळे रुग्णांची सोय झाली आहे. रुग्णांना सेवा देत असताना पहिल्यांदा “मानवता धर्म” पाळला जातो, असे सांगून, भिडे गुरुजींची हॉस्पिटलला सदिच्छा भेट हा हॉस्पिटलसाठी “अमृत योग” असल्याचे डॉ.चौगुले यांनी सांगितले.
“स्पंदन सुपर स्पेशलिटी” हॉस्पिटलमध्ये “महात्मा ज्योतिराव फुले” जन आरोग्य योजना, “प्रधानमंत्री जन आरोग्य” योजना, “विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य” योजना राबवली जाते. योजनेतील नमुद आजारानुसार रुग्णांना मोफत सेवा दिली जाते.
स्पंदन हॉस्पिटलचे एकूण कामकाज पाहून भिडे गुरुजी यांनी समाधान व्यक्त करीत हॉस्पिटलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, यावेळी हिंदुस्तान शिवप्रतिष्ठांचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, डॉक्टर अविनाश पाटील, डॉक्टर रवींद्र भोसले यांच्यासह हॉस्पिटल मधील कर्मचारी, शिवप्रतिष्ठांचे मावळे उपस्थित होते.