शेतकरी नेत्यांना चळवळीचे अस्तित्व व शेतकरी हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागणार.
विस्तारीकरण, कमी गाळप ,ऊस तोडणी व वाहतूक खर्च, वीज निर्मिती प्रकल्प, एफआरपी आणि उपपदार्थ उत्पन्नातील 70 टक्के वाटा, सरासरी साखर उतारा, ऊस नोंदीतील फेरफार आदी विषय गाजणार.
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
येथील श्री दत्त साखर कारखान्याची वार्षिक सभा कधी होणार याचे शेतकरी सभासदांना वेध लागले आहेत.विस्तारीकरण, कमी गाळप, उसतोडणी व वाहतूक खर्च, विज निर्मिती प्रकल्प अशा वेगवेगळ्या विषयावरून, पारंपारिक शेतकरी लढवय्ये, कारखानदारांना नडणार अशी चर्चा आहे.
काही दिवसानंतर होणाऱ्या वार्षिक सभेमध्ये चेअरमन रघुनाथ पाटील यांना व्यासपीठावरून शेतकरी, सभासदांना संबोधित करावे लागणार आहे, विविध प्रकारच्या विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला उत्तरे द्यावी लागणार आहेत, त्यामुळे पाटील कशा पद्धतीने सभा हाताळणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.
साखर कारखाने शेतकऱ्यांना विविध प्रकारे फसवत असतात, जसे की, वजन काटा , कमी दर आणि वेळेवर पैसे न देणे, व्याजाच्या रक्कम बुडवणे,अनावश्यक विस्तारीकरण करून कर्जा बोजा वाढवणे, उपपदार्थातून मिळणाऱ्या नफ्याची आकडेवारी लपवणे, बंद पडलेल्या संस्थेत ठेवी ठेवून गंगाजळीला मान्यता घेणे.
कारखानदारांच्या अशा धुर्त खेळीमुळे शेतकऱ्यांमध्ये तिव्र नाराजी आहे. ही नाराजी चालू गळीत हंगामाला उफाळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची मते व्यक्त होत आहेत. सध्या, शेतकऱ्यांची फसवणूक ही एक गंभीर समस्या आहे. शेतकऱ्यांनी जागरूक राहून आपल्या हक्कांसाठी लढले पाहिजे, याला पर्याय नाही.
कारखान्यांमध्ये उसाचे वजन कमी दाखवणे,वेळेवर ऊस तोडणी न करणे, वाहतूक खर्च अवाढव्य लावणे, उसाच्या नोंदींमध्ये फेरफार करणे, ऊस गाळपामध्ये अनियमितता ठेवणे, सरासरी साखर उतारा कमी दाखवून शेतकऱ्यांचे नुकसान करणे, फरवणुक करणे अशी शक्कल लढवली जाते.
अशा फसवणुकीच्या गंभीर बाबीवर शेतकऱ्यांनी, शेतकरी संघटनांच्या मदतीने वार्षिक सभेत जाब विचारणे, साखर आयुक्तांकडे तक्रार दाखल करणे, न्यायालयाची मदत घेणे, वेळोवेळी आंदोलन करून आवाज उठवणे अनिवार्य आहे. यासाठी शेतकरी एकजूट महत्वाची आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कारखानदारांशी दोन हात करणारे शेतकरी लढवय्ये मा.खा.राजू शेट्टी, अनिल उर्फ सावकर मादनाईक, धनाजी चुडमुंगे यांच्याकडून कारखानदारांना जाब विचारला जाईल असा विश्वास शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
राजकारणापेक्षा शेतकरी चळवळ किती महत्त्वाची आहे हे मागील काही वर्षात अधोरेखित झाल्यामुळे शेतकरी नेत्यांना चळवळीच्या अस्तित्वासाठी आणि शेतकऱ्यांचे हक्काकरीता रस्त्यावर उतरावे लागणार आहे.