गोविंदा, राजवर्धन कृष्णात पाटील ठरला, रोख 11 हजार रुपये, बक्षिसाचा मानकरी. शरद काळे यांच्याकडून दहीहंडीला “32 हजार” रू. प्रदान
दहीहंडीतून यादव प्रेमीची “नव्या” राजकिय, सामाजीक, सांस्कृतिक “पर्वाला” आत्मविश्वास पुर्वक सुरुवात.
शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
संपुर्ण शिरोळ शहराला आस लागून राहिलेली, तरुणांच्या गळ्यातील ताईत ठरलेली, प्रतिष्ठेची, मानाची आणि गर्दीचा उच्चांक मोडणारी यादव प्रेमी युवा मंचची 1 लाख 11 हजार 777 रुपये बक्षीस असणारी तालुक्यातील सर्वात मोठी दहीहंडी, कुटवाडच्या “नृसिंह गोविंदा पथक”ने फोडली. तर, “खमक्या”चे संपादक शरद काळे यांच्याकडून दहीहंडीसाठी “32 हजार”रु. प्रदान करण्यात आल्याचे संयोजक, आयोजक, अध्यक्ष भालचंद्र दिगंबर ठोंबरे, अजित देशमुख यांनी सांगितले.
शिरोळातील दहीहंडीचे पहिले आयोजक स्व. शिवाजीराव यादव यांच्या स्मरणार्थ बुधवारी रात्री येथील पद्माराजे विद्यालयाच्या क्रीडांगणावर युवा नेते “पृथ्वीराजसिंह यादव”, “राहुल यादव” यांच्याकडून दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. चित्त थरारक आणि क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या दहीहंडीचा नृसिंह गोविंदा पथकाने मान मिळवला.
निमंत्रित गोविंदा पथकांचा थरार पाहण्यासाठी भर पावसातही गर्दीने उच्चांक मोडला. मुंबईतील राणी साईबाई प्रतिष्ठान महीला गोविंदा पथकाने सलामी दिली. यादव प्रेमी युवा मंच आयोजित दहीहंडी फोडण्यासाठी शिरोळातील जय हनुमान गोविंदा पथक, अजिंक्यतारा गोविंदा पथक, जय महाराष्ट्र गोविंदा पथक, गोडी विहीर एस.पी. बॉईज गोविंदा पथक आणि कुटवाडच्या नृसिंह गोविंदा पथक या गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता.
दहीहंडी फोडणाऱ्या कुटवाड्याच्या नृसिंह गोविंद पथकाला एक लाख 11 हजार 777 रुपये रोख रक्कम आणि पाच फुटी कायम चषक असे पारितोषिक देण्यात आले. तर, दहीहंडी फोडणारा गोविंदा राजवर्धन कृष्णात पाटील यास 11 हजार रुपये व शिरोळचे माजी ग्रामपंचायत सदस्य निळकंठ उर्फ पिंटू फल्ले यांच्याकडून पाच फूटी चषक व सन्मान चिन्ह देण्यात आले.
प्रसिद्ध सिनेअभिनेत्री अनुश्री माने, तासगांवचे युवानेते राहुल पाटील, रणजीतसिंह पाटील, माजी सभापती कविता चौगुले, जि.प. माजी समाज कल्याण सभापती स्वाती सासणे, सांगलीचे उपमहापौर धीरज सूर्यवंशी बाजार समितीचे सभापती आण्णासो पाणदारे, संचालक शिवाजी चव्हाण यांच्यासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, सहकारी सेवा संस्थांचे पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक उपस्थित होते. यादव प्रेमी युवा मंचचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
ध्येय निष्ठ नवे पर्व सुरु i
दरम्यान, शहरवासियांसाठी अत्यंत महत्त्वाची असणाऱ्या दहीहंडी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या “बारीक सारीक” घडामोडीवर लक्ष ठेवून, “अफवांना पायदळी तुडवत” नियोजनबद्ध बीमोड करून ,दहीहंडीच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक ठेवा कसा असतो याची उत्तम उदाहरण देत, “नवे पर्व” सुरू झाल्याचा संदेश हजारो प्रेक्षकाबरोबर शहराला अनुभवास मिळाला.
राजकीय, सामाजिक ध्येय आणि शहरवासीयांचा चेहऱ्यावर आनंद
दहीहंडी कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजक, संयोजकांनी राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक असलेले बाबा उर्फ प्रतापराव पाटील, मा.खा.राजू शेट्टी, मा.आ. उल्हास पाटील, आमदार अशोकराव माने, मा. नगराध्यक्ष नीता माने, दत्त उद्योग समूहाचे सर्वेसर्वा गणपतराव पाटील, चेअरमन रघुनाथ पाटील, अनिलराव यादव, संचालक दरगू गावडे, शेखर पाटील भाजपाचे नेते अनिल उर्फ सावकर मादनाईक, माजी सरपंच अविनाश कांबळे यांच्यासह, व्यासपीठावरील उपस्थिती मान्यवरांचा सन्मान करून एका नव्या पर्वाला सुरुवात केल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता.