चिन्हावर लढण्याची घोषणा हवेतच ? घाटगे व निंबाळकरांसमोर कमळाचे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान ?
शिरोळ, जयसिंगपूर आणि कुरुंदवाड नगरपरिषद निवडणुकीबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नाव घेतले जात नाही. महाआघाडीशी त्यांचा संबंध जोडला जात नाही. पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही. विधानसभा निवडणूक आली की, तिकीटासाठी व प्रचार शुभारंभासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे आठवतात. सध्या, शरद पवार यांचा पक्ष फोडण्याचाही प्रयत्न सुरू आहे. अशा धुर्त नेत्यांला अद्दल घडवण्याचा निर्धार पवार गटाने केल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
शिरोळ : शरद काळे
शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर पृथ्वीराजसिंह यादव यांचे स्व. दिनकररावजी यादव पॅनेल व महाविकास आघाडीचे गणपतराव पाटील मा.आ. उल्हास पाटील तसेच स्वाभिमानीचे प्रमुख, मा.खा.राजू शेट्टी यांची एकत्रित आघाडी वगळता निवडणूक रिंगणात, लढाई करण्याची वायफळ वल्गना करणाऱ्यांना उमेदवार मिळायला तयार नसल्याची चर्चा आहे. आता उमेदवाराची “चोरी” करणे किंवा “उष्ठे” उमेदवार घेऊन निवडणूक लढवणे हे दोनच पर्याय असल्याचे मतदार बोलत असल्याचे समजते.
नगरपरिषदेच्या निवडणुकीत पृथ्वीराजसिंह यादव यांचे पॅनेल निवडून येणार याची इतर आघाडी, पक्ष, पॅनेल, युती यांना खात्री झाल्यामुळे बळीचा बकरा करण्यासाठी कोणाच्या दारात उमेदवारी घ्या म्हणून जायचे ? कोणाला उमेदवारी द्यायची ? हा गंभीर प्रश्न, रिंगणात उतरणाऱ्यांपुढे ठाकला असल्याचे समजून येत आहे. उगेदवार निवडीचा प्रश्न संपवण्याअगोदरच एका उमेदवाराने, पदाच्या अभिलाषा पोटी इच्छुक कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून स्वतःच्या कायम भावी पदासाठी आघाडीची दावण बरी असा निर्णय घेतल्याची चर्चा शिरोळ शहरात रंगल्याचे समजते.
एका घरात दोन पक्ष आणि आमदारकी, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक तसेच भाजपाचे पद असलेले अशोकराव माने हे जनसुराज्यचे हातकणंगले तालुक्यातील आमदार आहेत (फक्त शिरोळात वास्तव्य), मुलगा डॉ.अरविंद हे भाजपाचे राज्य पदाधिकारी आहेत. भाजपा आणि जनसुराज्य असे दोन बलाढ्य पक्ष घरात असताना देखील, डॉ. माने कमळ चिन्हावर निवडणुक लढण्यासाठी पुढे यायला तयार नाहीत, दुसऱ्याशी युती करण्याच्या मानसिकतेत आहेत, का ? त्यांना भिती वाटत आहे का ? अशी सवालात्मक चर्चा करून यासारखे दुसरे दुर्दैव नसल्याचे मतदार बोलत आहेत.
भाजपा व जनसुराज्यची नगण्य ताकद ? जुना-नवा कार्यकर्ता असा दुफळी संघर्ष ? पृथ्वीराजसिंह यांनी रामराम ठोकल्यानंतर ढासळलेला रेशो ? कमळ चिन्हाचे अस्तीत्व ?, गांधी “बापू”च्या गठ्ठ्यासाठी त्या उमेदवाराला कवटाळण्याची “त्याने” केलेली धुर्त खेळी, जादू ,लिंबू ? त्या इच्छुक उमेदवाराने आघाडीला मारलेली मिठी ?, इतर पक्ष, गट, तटातून आलेल्या कार्यकर्त्यांना “डिबार” करण्यासाठी “त्याने” केलेला डाव ? बेवारस ठरवलेले आणि निवडणुकीच्या वाऱ्यात घुटमळलेले इच्छुक कार्यकर्ते ? या गंभीर बाबीचा, आरसा दाखवण्याचे आव्हान, सर्वेसर्वा माधवराव घाटगे आणि जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या समोर आहे.