भ्रष्ट कारभार, चाणक्य निती श्रेष्ठ ठरणार की, मतदारांच चक्रव्यूह ?
जयसिंगपूर/शिरोळ/कुरुंदवाड : शरद काळे
जयसिंगपूर, शिरोळ ,कुरुंदवाड नगरपरिषदांच्या निवडणुकीचा “सायरन” लवकरच वाजणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे परंतू, निवडणूक रिंगणात दोन हात करण्याच्या “बाता” मारणारे अन्य पॅनेल, आघाडी ,पक्ष यांच्यात आज अखेर कुठेच एकमत, युती, जागावाटप झाल्याचे दिसून येत नसल्याची तालुक्यात चर्चा आहे.
शिरोळ तालुका खिशात आहे, अशी बोगस मतांच्या जिवावर “फुसकी” आरोळी ठोकूण स्वतःला मातब्बर समजणाऱ्या दोघांनी “फसव्या” “32 हजार बुडव्या” व “भ्रष्टाचारी” “40 टक्केखोर” तसेच “लालची” वर विश्वास ठेवला आहे, मतदार, नागरीकांना “अमरत्व” पाजण्याची जबाबदारी देण्याचे काम केले आहे, याचा घसघशित फायदा स्थानिकांना होणार आहे, त्यामुळे निवडणुका सोप्या जाणार असल्याचे मतदार बोलताहेत.
निवडणुकीत लाटता येणाऱ्या गांधी “बापू”च्या गठ्ठ्यावर बुडव्यांची नजर असल्यामुळे जीव तोडून प्रयत्न केला जाणार नाही, याची मतदार, नागरीकांना पक्की खात्री झाल्याचे समजते, यासाठी कोणत्या भविष्यवाण्याची सुद्धा गरज नाही, या लुटारू वृत्ती, प्रवृत्तीचा आता कायमचा बंदोबस्त करण्याची, कायमचे घरात बसवण्याची, संधी आपोआपच मिळाली आहे, या संधीचं सोनं करण्याचा निर्धार समुदाय,नागरीक, मतदारांनी केल्याचे समजते.
घरात शेती नाही, शेतकरी नाही, उद्योग-धंदा नाही, मजूरी नाही, नोकरी-चाकरी नाही, तरीही कोट्यावधीची “ऐट”, एवढा पैसा आला कुठून ? या प्रश्नांची उत्तरे, शासनाची फसवणुक ?, ढपला ? टॅक्स म्हणून जनतेने दिलेल्या पैशाच्या तिजोरीवर दरोडा ? यातच असल्याचे नागरीक बोलताहेत. याच फसवणुक, ढपल्याच्या जीवावर आता सगळी पदे घरातच मिळायला पाहिजेत अशी हाव सुटली आहे, त्यामुळे आता “बापू”चा गठ्ठा घ्यायचा पण, द्यायचे नाही, असा मतदारांचा सुर असल्याचा समजते.
शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या त्या “निष्पापी” महामानवाला आता स्थानिक स्वराज्य संस्था लुटण्याचे वेद लागेल आहे, यासाठी त्याने गुलालाने माखलेला “नारळ” फोडून गुलाब, कमळ फुलांना पायाखाली घेवून विश्वास घात करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत, शिवाय हे पाप “राजर्षि शाहू” महारांजांच्या नावावर खपवून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.