“बाळू”च्या खाजगी सावकारीत भागीदार असणारी ती पतपेढी कोणाची ?सावकारीला पतपेढीचे प्रोत्साहन असेल तर, “सर्व” गरजूंचा “उदय” कसा होणार ?
बाळूच्या “हैदोसखोरी”मुळे तीन कुटुंबांचा बळी ?, पोलीस यंत्रणा बाळूच्या मुसक्या आवळणार ? बाळूने “नो एन्ट्री” चा कायदा लावलाय ?
हसूर/ शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
खाजगी सावकारीतील “असुर” “बाळू”ने गुंगारा देत, खाजगी सावकारीतून “मान” मिळवण्यासाठी “गावे-गावे” पिंजून काढून “चाळीस”हून अधिक अबलांचे केले शोषण ? केल्याच्या “खमक्या”मधील वृत्ताने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. “बाळू”च्या खाजगी सावकारी बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक मुंबई, कोल्हापूर परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे “बाळू”च्या खाजगी सावकारी मागे एका पतपेटीने लाखो रुपये लावले असल्याचे चर्चेत आहे. ठेवीच्या रकमा आणि दाम दुप्पट योजनेखालील रकमांचा संस्थेवर ताण पडू नये, बाहेरच्या बाहेर व्याजाची रक्कम मिळावी. आणि हेतू साध्य व्हावा. या उद्देशाने “बाळू”च्या खाजगी सावकारीला त्या पतपेढीने पाठबळ दिल्याचे बोलले जात असल्याचे समजते.
कोणतीही संस्था, सभासद, ठेवीदारांचा “उद्धार” व्हावा, अडचणीतील कुटुंबाचा “सर्व” बाजूने “उदय” व्हावा, या “उदात्त” हेतूने काम करीत असते. परंतु, “बाळू”ला आशीर्वाद दिलेली संस्था, पैशाची कमतरता असलेल्या कुटुंबाला खाजगी सावकारीने कर्ज देऊन बाळूच्या माध्यमातून छळवाद ?,अबलांचे शोषण ? करण्याचे घाणेरडे कृत्य करीत असल्याची चर्चा आहे.
कृष्णा नदीपलीकडील “गणेशवाडी”च्या आधारावर बाळूने खाजगी सावकारीच्या व्यवसायाला सुरुवात केली. त्यात संस्थेने मोलाची भागीदारी दिली ?, व्याजाला सोकावलेल्या बाळूने कर्जदाराच्या परिस्थितीचा फायदा घेऊन थेट “आबलां”च्या “दागिन्याला” हात घालण्यास सुरुवात केल्याचे नागरिक बोलत असल्याचे समजते.
जसे एखादी “व्हीव्हीआयएमपी” व्यक्ती येणार म्हटल्यानंतर संपूर्ण एरिया “बॅन” करून “नो एन्ट्री” केली जाते, तसे व्याजांनी पैसे घेतलेल्यांच्याकडे, व्याज मागणीसाठी “बाळू”ची एन्ट्री होणार म्हटले की, परिसर, घरामध्ये मालकासह इतरांना “नो एन्ट्री” असा कायदा “बाळू”ने लागू केला असल्याचे चर्चेत आहे.
खाजगी सावकारीतून दहशत माजवीत संबंधित बाळूने “हैदोसखोरी” वाढवल्याची चर्चा आहे. या “हैदोसखोरी”मुळे असाह्य झालेल्या “तीन” कुटुंबाचा “बळी” गेल्याचे नागरिक बोलत आहेत. मात्र, बाळूला याचा पश्चाताप नाही, “तो मी, नव्हेच.” अशा अविर्भावात, ग्रामदैवत “लक्ष्मी”ची शपथ घेऊन वावरत असल्याचे समजते.