शंकर कुंभार विरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, सीसीटीव्ही फुटेज तपासणीनंतर पुन्हा दाखल होणार दुसरा गुन्हा ?
जयसिंगपूर : खमक्या वृत्तसेवा
पार्किंग मध्ये कॅमेरे बसवत असताना दांडगावशाहीने वायर उपसून टाकून, अश्लील शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शंकर मारुती कुंभार याच्या विरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनंदा संजय बर्डे या महिलेने कुंभार यांच्याविरुद्ध फिर्याद दिली असून कुंभार याने केलेल्या कृत्या विषयी सीसीटीव्ही फुटेज तपासून पुन्हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे फिर्यादीचे पती संजय बर्डे यांनी सांगितले.
याबाबतची अधिक माहिती अशी की, बर्डे आणि कुंभार हे दोघे एकाच अरिहंत अपार्टमेंट मध्ये वास्तव्यास आहेत. पार्किंगच्या कारणावरून कुंभार हे बर्डे यांच्याबरोबर सतत वाद घालत असतात. शनिवारी बर्डे हे आपल्या हक्काच्या पार्किंग मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवत असताना कुंभार याने, फिर्यादी सुनंदा बर्डे यांना अश्लील शिवीगाळ करून पती-पत्नीस जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
शंकर मारुती कुंभार हे स्व.रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे नातू असल्याचे समजते. कुंभार हे प्रख्यात बिल्डर असून त्यांचे न्यूयॉर्कमध्ये तेरा मजली अपार्टमेंटचे बांधकाम सुरू असून बिल्डर म्हणून त्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर रजिस्ट्रेशन असल्याचे लोक सांगतात. कुंभार यांचे लाखो रुपयांची मदत केलेले शिक्षक, वेगवेगळ्या पतसंस्था, बँका, हाऊसिंग फायनान्स कंपन्या, फोर व्हीलर फायनान्स कंपनी, खाजगी सावकार यांच्याशी अतूट व जिव्हाळ्याचे नाते असल्याची चर्चा जयसिंगपुरात असल्याचे समजते.
बिल्डर म्हणून बांधकाम करण्यात आलेल्या अपार्टमेंटमधील सदनिका खरेदीसाठी कुंभार यांच्या दारात नेहमी लोकांची रांग लागत असल्याचे समजते. सदनिका विक्री करताना ते कोणताही बनावट कागद, खरेदी पत्रात जोडत नाहीत. कोणताही नोटरी करार करताना ते कागदपत्रांची हेराफेरी करीत नाहीत, पारदर्शी कागदपत्रातून ते सदनिकाची विक्री करीत असल्याचे लोक बोलतात.
प्रख्यात बिल्डर कुंभार यांचे न्यूयॉर्कमध्ये अपार्टमेंट बांधकाम सुरू असल्यामुळे सांगली, कोल्हापूर, सोलापूर ,सातारा, पुणे जिल्ह्यातील अनेक बिल्डर कुंभार यांच्या सल्ल्यासाठी त्यांच्या दरवाज्यात वाट बघतात, अशी चर्चा आहे. तसेच पतसंस्था, बँका, फायनान्स कंपनी मार्गदर्शन घेण्यासाठी चातक पक्षासारखी वाट बघत त्यांच्या घरासमोर गर्दी करून असतात असेही नागरीक बोलत असल्याचे समजते.
शंकर कुंभार यांनी डॉक्टरकीची पदवी इचलकरंजी येथील एका इसमांकडून सव्वा लाखाला विकत घेतली नाही तर, ती सामाजिक कार्याचा डोंगर उभा करून मिळवली असल्याचे लोक बोलतात. याशिवाय शंकर कुंभार नेहमी, एक दिवस देशाचा पंतप्रधान होऊन देशसेवा करणार असल्याचे सांगतात असेही लोक बोलतात.
शंकर कुंभार यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सांगली, कोल्हापूर येथून त्यांच्या चाहत्यांची झुंबड लागते, ते कधीही पदरच्या पैशाने वाढदिवसाचे फलक लावत नाहीत. त्याचे चाहते उस्फूर्तपणाने कोल्हापूर पासून सांगली पर्यंत, जयसिंगपूर पासून शेडशाळपर्यंत हजारो फलक लावून त्यांना शुभेच्छा देतात अशी चर्चा आहे.