तालुक्यातील भाजपाचा तो गट, शिरोळात यादवांच्या उमेदवारांचा छुपा प्रचार करणार ?
शिरोळ : शरद काळे
इंडिया आघाडीने शिरोळ, जयसिंगपूर आणि कुरुंदवाड नगरपालिका निवडणुका लढण्याची घोषणा जाहीर केल्यानंतर शिरोळ मधील राजकीय समीकरण घट्ट झाले आहे. ही बाब यादव पॅनेलचे “नेतृत्व” करणारे पृथ्वीराजसिंह यादव यांना अधिक फायदेशिर झाल्याचे मतदार बोलत आहेत.
मतदारांच्या मनात रुजलेल्या पृथ्वीराजसिंह यादव यांना शिरोळ शहरातील तमाम नागरिकांबरोबर,आम.बंटी उर्फ सतेज पाटील, राजू शेट्टी, गणपतराव पाटील यांचा जाहिर पाठिंबा व मदत आहे. नागरिक मतदारांचा विश्वास मिळवण्याबरोबर उमेदवार निवडीमध्ये यादव यांनी भाजपा व राजर्षी शाहू आघाडीला कोसो मैल मागे टाकले आहे.
यादव पॅनेलचे “नेतृत्व” करणारे पृथ्वीराजसिंह यादव यांनी निवडलेले उमेदवार हे सर्वांचेच असतील असा विश्वास यापूर्वीच सर्वांना दिला आहे. राजर्षी शाहू विकास आघाडी किंवा भाजपा आता शिरोळात नको अशा विचारधारेतून मतदारांनी पृथ्वीराजसिंह यांना मोठे पाठबळ दिले आहे. आता भाजपाचा तो गट सुध्दा, स्वतःहुन यादव यांच्या उमेदवारांचा छुपा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरणार असल्याचे खात्रीशीर वृत्त समजते.
विकास निधीच्या नावाखाली टक्केवारीचे राजकारण, कचरा ठेक्यात 5 कोटी मायेचा भ्रष्ट कारभार, जमिन आरक्षण, खोटे जाब जबाब, पैशाची बुडवा बुडवी,12 जणांची ढापलेली 2 कोटी 28 लाखाची माया, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणीत राजकारण, अशा अनेक कारनाम्यांचा अक्षरशः विट आल्याचे नागरिक मतदार बोलत असल्याचे समजते.