भावी पीएसआय निखिल खाडे यापुर्वी मुंबई क्राईम ब्रँचचे प्रमुख पोलीस अधिकारी होते, याची कोणाला खबर होती का ?
क्राईम ब्रँचचे प्रमुख पोलीस अधिकारी खाडे साहेब यांचा, कमी दरात साखर विक्रीचा धंदा आहे.
चोर लोक, क्राइम ब्रँचचे अधिकारी म्हणून सांगू लागले तर, खऱ्याखुऱ्या अधिकाऱ्यांनी आम्ही कोण आहे, म्हणून सांगायचं ?
मुंबई/शिरोळ/घालवाड/पदमाळे : खमक्या वृत्तसेवा
भावी पीएसआय निखिल खाडे याने मुंबई क्राईम ब्रँचचा प्रमुख पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करून, पंचवीस रुपये किलो प्रमाणे साखर देतो असे सांगून वीस हजार रुपये घेवून गंडा घातल्याची खळबळजनक माहिती शिरोळ येथील पण सध्या, मुंबई स्थित असणाऱ्या एकाने “खमक्या”ला दिली आहे.
मुंबई क्राईम ब्रँचचा प्रमुख पोलीस अधिकारी साखर विक्री करतो, याचे पहिल्यांदा आश्चर्य वाटले होते. परंतु, एका पोलीस अधिकाऱ्यावर चुकीचा संशय घेणे चुकीचे ठरेल. म्हणून पोलीस अधिकारी खाडे 20 हजार रुपये दिले. बरेच दिवस निघून गेल्यानंतर त्याने साखरही दिली नाही, आणि पैसेही दिले नाहीत.
तुझी साखर नको पण, पैसे परत दे ! अशी मागणी करताना खाडेने अश्लील आणि घाणेरड्या भाषेत शिवीगाळ सुरू केली, म्हणून थेट घालवाड येथे जाऊन त्याची चौकशी केल्यानंतर, त्याच्या घरच्या लोकांनी, त्याने असंच राधानगरीतील एका व्यक्तीला 45 हजार रुपयांचा गंडा घातला आहे.
तरुण युवक पिढीला Human Immunodeficiency virus चा धोका ?
वर्तमानपत्रात जाहिरात घेऊन त्याचा कुटूंबाशी संबंध नाही, असे जाहीर केले आहे. त्यामुळे पैशाचे, साखरेचे त्यालाच विचारा असे घरच्या लोकांनी केले. त्यानंतर त्याची एकदा भेट झाली, त्याने पैसे आणून देतो असे सांगितले. परंतु, आतापर्यंत पैसे दिले नाहीत.
स्वामी समर्थ ग्रुपच्या माध्यमातून खाडे याची पदमाळे जिल्हा सांगली येथील बहिणीशी ओळख झाली. बहिणीने घर बांधकामात आलेल्या अडचणीबाबत खाडेशी चर्चा केली. खाडेने मी मुंबई क्राईम ब्रँचचा अधिकारी आहे, काळजी करू नका, मुंबई क्राईम ब्रँचमधून अर्ज करतो, तुमचे काम तिकडे होऊन जाईल, असे आश्वासन दिले.
त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. पुढे जाऊन याच ठकसेनने, कमी दरात साखर देतो असे सांगून 20 हजाराला चुना लावल्याचे सांगत पिडीत म्हणाले, मुंबई येथे “खमक्या” वेबसाईट वर खाडे याच्या प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वाचनात आल्या. कुणीतरी पिडित महिला पाय रोऊन उभा आहे. याची माहिती मिळाली. त्यानंतर वस्तुस्थिती कथन करण्यासाठी “खमक्या”शी संपर्क साधला.