
दत्तनगर, आपत्य निर्मिती उपचार केंद्र, एसटी स्टँड परिसर, श्वर तलाव परिसरातील तीन जणांनी खुलेआम सुरू केला “भोग्या” व्यवसाय ?
भोग्यांना काही तासासाठी खोल्या भाड्याने देणारे व “भोग्या” ठेवून व्यवसाय करणाऱ्यावर धाड टाकून पर्दापाश करण्याची मागणी.
जिल्हा पोलिस अधिक्षक, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख व विभागिय पोलिस अधिकारी यांनी लक्ष घालण्याची गरज.
कुरुंदवाड/शिरोळ/जयसिंगपूर : खमक्या वृतसेवा
शिरोळ, कुरुंदवाड, नृसिंहवाडी, हेरवाड, तेरवाड, इंजिनिसिंग कॉलेज व मौ. आगर परिसरातील अनेक कुटूंबे “अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम”/Human Immunodeficiency virus या भयानक विषाणूमुळे उध्वस्त होण्याच्या शक्यतेची चर्चा आहे.
चेथे क्लिक करा : https://khamkyanews.in/?p=141
दत्तनगर, आपत्य निर्मिती उपचार केंद्र, एसटी स्टँड परिसर, श्वर तलाव परिसरातील तीन जणांनी खुलेआम “भोग्या” व्यवसायाच्या माध्यमातून, पैशाची खाण खोदण्याबरोबर तरुण पिढीला भुरळ पाडून बाधित करण्याचा प्रयत्न सुरू केल्याच्या खळबळ जनक माहितीची चर्चा सुरू आहे.
यातील दोन जण (Human Immunodeficiency virus) विषाणू बाधित झाल्याचे समजते. या विषाणूचा तरुण पिढीमध्ये फैलाव वाढल्यास आई-वडिलांना “वारसा” शिवाय आणि पत्नीला “कुंकू, मंगळसूत्र” शिवाय आयुष्य काढावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

यातील दत्तनगर मधील “मॅंगो” पडनामकाचे, सकाळी 10 ते रात्री 8 वाजे पर्यंत “सिटी स्टार”वर “भोग्या” चे काम चालते. मागील दोन वर्षात मॅगोने या व्यवसायातून लाखोची कमाई केली असल्याची चर्चा आहे. या “मॅंगो” पद्धतीमुळे परिसरातील अनेक तरुण युवक डोक्याने नशेखोर झाल्याचे बोलले जात आहे.
सायंकाळच्या वेळी “लक्ष्मी-कुबेर” घरी येतात म्हणून अनेक कुटूंबे आपल्या घरात सुहासिक “अगरबत्ती” लावून “पणती” लावतात. घर प्रसन्न ठेवतात. तशीच व्यवसायात प्रसन्नता वाटावी, “मुर्ती लहान पण, कीर्ती महान” याची अनुभूती सर्वांना मिळावी, “यश” मिळावे अशी प्रार्थना केली जात असल्याचे समजते.
येथे क्लिक करा : https://khamkyanews.in/?p=149
रात्रीच्या “भोग्या” व्यवसायातून “यश” मिळवण्यासाठी सायंकाळी 7 वा.नंतर अंधारात, कारखाना आणि कचेरी बस स्टाप वरुन कार गाडीच्या माध्यमातून, मुर्तीच्या महान किर्तीच्या हालचाली गतीमान होतात.आणि सकाळी खरकट्या तोंडाने दार ठोठावतात असे बोलले जाते.
नवी सुरुवात म्हणून प्रसिद्ध आपत्य निर्मिती केंद्रात बसून नियोजन करायचे, देवदर्शनानिमित्त “वाडी”त जावून “यात्री” म्हणून “निवास” करायचा, जवळच्या गावात जाऊन “सनसिटी” चे दर्शन घ्यायचे. टाईम पास म्हणून टिव्ही स्क्रीनवर “सौरभ गांगूली”च्या बॅटींगचा आनंद घ्यायचा. आणि ऐटीत खुर्चीत बसून पाटलाला शोभनारी भाषा करण्याची पद्धत असल्याची चर्चा आहे.
येथे क्लिक करा : https://khamkyanews.in/?p=143
एकूणच स्थानिक “खाकी”चे दुर्लक्ष आणि “प्रेम-माया” यामुळे तरुण युवक पिढीला (Human Immunodeficiency virus ) घातक विषाणूचा धोका निर्माण झाला असल्याची चर्चा आहे. या घातक विषाणू पासून तरुणांची मुक्ती करण्याबरोबर कुटूंब वाचवण्यासाठी प्रभारी जिल्हा पोलिस अधिक्षक, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख व जयसिंगपूर विभागिय पोलिस अधिकारी यांनी संबधीत व्यक्ती व व्यवसायावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
भाग : एक

