वीज महावितरण कंपनीच्या स्मार्ट मीटर बसवण्याला ग्राहक त्याचबरोबर विविध संघटना यांचा विरोध असताना ठेकेदार नेमून स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.
नुकतेच शिरोळ येथील संगमनगरमध्ये जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न केला. परंतु, हा प्रयत्न आंदोलन अंकुश संघटनेने उधळून लावला. अधिकाऱ्यांना, ग्राहकावर दबाव वाढवू नका, स्मार्ट मीटरची गरज असेल तर, अर्ज करू. जबरदस्तीने मीटर बसवण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देऊ असा स्पष्ट इशारा संस्थापक अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी दिला.
वीज वितरण कंपनीचे विजेचे खांब सरळ नाहीत, वायरी खूप जुन्या आहेत, ट्रान्सफॉर्मर वारंवार बंद पडतो, कृषी विभागाची लाईन केव्हाही बंद करतात, वारंवार होणाऱ्या सिंगल फेज अडचणीवर महावितरणकडे कोणतीही सोल्युशन नाही, डीपी फ्युज बॉक्समध्ये वायरी जोडलेल्या आहेत यांना पैसे खर्च करायला नकोत, नागरिकांची काळजी नको पण, पैसे मिळायला पाहिजे असा वीज वितरण कंपनीचा डाव असल्याचे नागरिक ग्राहक बोलताहेत.
स्मार्ट मीटर बसवणारी ही यंत्रणा कंत्राटी पद्धतीची असल्यामुळे त्यांना जबरदस्तीने मीटर बसवता येत नाही, आणि जबरदस्ती केली तर, नागरिकांनी त्याच भाषेत थोपटून काढले तर कोणी विचारण्याचा संबंध नाही, कारण ते लोक खाजगी आहेत. अशी चर्चा रंगली होती.